रोजगारनिर्मीतीसाठी 2 व 3 नोव्हेंबरला बुके सजावट कार्यशाळा

0
पिंपरी चिंचवड : संत तुकारामनगर येथील ओम फ्लॉवर इन्स्टिट्यूटच्यावतीने येत्या 2 आणि 3 नोव्हेंबर रोजी फुले सजावट प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा संत तुकारामनगर पिंपरी येथील ऍटलास कॉलनी हॉल येथे सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत पार पडणार आहे, अशी माहिती इन्स्टिटयूटचे संस्थापक केशव त्रिभुवन यांनी दिली.
व्यावसायिकांसाठी प्रशिक्षण…
पिंपरी चिंचवडच नव्हे, तर राज्यात अन्यत्र कुठेही अशा प्रकारचे प्रशिक्षण मिळत नाही. आज पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहरात अनेक छोटे मोठे फुल व्यावसायिक आहेत. मात्र, यातील निम्म्यापेक्षा अधिक व्यावसायिक केवळ हाराचाच व्यवसाय करतात. त्यांना फुल सजावटीचे ज्ञान नसल्यामुळे ते याकडे वळत नाहीत. आज सजावटीला खूप महत्व येत चालले आहे. त्यामुळे या व्यवसाययिकांची अडचण लक्षात घेऊन या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
विविध सजावटी शिकण्याच्या संधी…
या कार्यशाळेत सर्व प्रकारचे बुके बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. टेबल डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, गाडी सजावटीचे सर्व प्रकार, गणपती डेकोरेशन अशा अनेक प्रकारच्या फुलांच्या सजावटीचे प्रकार शिकविण्यात येणार आहेत. या कार्यशाळेत बेरोजगार तरुण- तरुणी, तसेच छोटे फुल व्यावसायिक आणि ज्यांना फुल सजावटीची आवड आहे, असे कुणीही यामध्ये सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी केशव त्रिभुवन यांच्याशी 9822108069 9372108069 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.