रोजगाराअभावी पदवीधरांना मारावा लागतो झाडू

0

शहादा । बेरोजगार तरुणांची संख्या भारतात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मुल शिक्षण घेतात पण नोकरी नाही. त्याअभावी ग्रॅज्युएट झालेली मुल देखील ऑफीसात झाडु मारतांना दिसतात अशी व्याथा भारतीय मानवाधिकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शेख यांनी मांडली. ते भारतीय मानवाधिकार परिषद शहादातर्फेपंचायत समितीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पंचायत समितीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित तालुका कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प. भारत अध्यक्ष सुनिल परदेशी, युथ महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. दानिश खान, विरेंद्रसिंग टिळे, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष भाऊसाहेब भराते, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष अर्चना निवासकर, जनरल सेक्रेटरी नाशिक मनिषा पाटील, सुषमा बोरसे नाशिक, महिला अध्यक्ष नंदुरबार संगिता जयस्वाल, सोशल प्रोटेक्शन जिल्हा अध्यक्ष नंदुरबार अमिता जयस्वाल, नंदुरबार जिल्हा सचिव शिला पाटील हे उपस्थित होते.

शासकीय कामे पैसे देवून करू नका
श्री. हाजी शेख यांनी पुढे सांगितले की, जेष्ठ नागरीक हे आपल्या मुलभुत गरजापासुन लांब रहतात. त्यांना पेंशन मिळविण्यासाठी देखील फिरावे लागते. मानवाधिकार परिषदेने आतापर्यंत किमान 5 हजारापेक्षा जास्त लोकांचा समस्या सोडविल्या आहेत. महिलांवर होणारे अत्याचार शारिरीक शोषण, सार्वजनिक ठिकाणी होणारे अत्याचार अश्या अनेक विषयावरील समस्या सोडविण्यासाठी मानव परिषद बांधील आहे. पुढे बोलतांना ते म्हणाले, सरकारीकाम करतांना पैसे देणे घेणे व कामधंदासोडुन हे आम्हाला करुन द्या अश्या प्रकारची लाचारी पत्करण्याची गरज नाही. आपण टॅक्स भरतो, रिटर्न्स भरतो त्यामुळे आपल्या कामासाठी कोणी खिशातुन पैसा देवुन काम करत नाही ते त्याचे कर्तव्य आहे. अश्या विविध विषयांवर त्यांनी चर्चा केली व उपस्थितांना आपल्या मुलभुत गरजा व हक्काची जाणीव करुन दिली. संगिता जयस्वाल , सुनिल परदेसी, अमिता अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त केले. यशस्वीतेसाठी जावेदखॉ पठाण, दरबारसिंग, रघुनाथ चिंधा आदि परिषदेचे सन्मानिय कार्यकर्त्यानी कामकाज पाहिले. सूत्रसंचालन व आभार प्रा. गणेश सोनवणे यांनी मानले.