मोदींनी दिल्या सर्व मंत्र्यांना सूचना
नवी खेळी खेळण्याची तयारीत
हे देखील वाचा
नवी दिल्ली : मागील 4 वर्षात किती रोजगार निर्मिती झाली याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मंत्र्यांकडून मागविली आहे. रोजगाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसह विरोधकांनी वारंवार लक्ष्य करत असल्याने 2019 मधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी आता नवी खेळी खेळण्याच्या तयारीत असल्याचे सुत्रांनी सांगितले. प्रत्येक विभागाकडून किती रोजगार उपलब्ध झाले आणि होणार आहेत याची सखोल माहिती गोळा करा. त्याचबरोबर देशाच्या जीडीपीवर या रोजगाराचा कसा परिणाम झाला आहे याचेही मोजमाप करा, असे निर्देश मोदींनी मंत्र्यांना दिले आहेत.
रोजगार देण्याचे आश्वासन पाळले नाही
मोदी सरकारने मेक इन इंडिया अभियान राबवत थेट परकिय गुंतवणूकीला चालना देण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातून किती रोजगार उपलब्ध झाला याची अधिकृत आकडेवारी अस्तित्वात नाही. त्यानंतर नोव्हेंबर 2016 मध्ये केलेल्या नोटाबंदीमुळे अनेकांना आपली कामेही गमवावी लागली होती. प्रत्येक वर्षी 1 कोटी रोजगार देणार असे आश्वासन मोदींनी निवडणुकीत दिले होते. मात्र, ते अद्याप पूर्ण झालेले नाही अशी टीका विरोधक सातत्याने करत आहेत. हा आरोपच खोडून काढण्यासाठी आता मोदींनी सर्व मंत्र्यांना माहिती गोळा करण्याच्या कामाला लावले आहे. 2019च्या निवडणुकांमध्ये मोदींना या आकडेवारीची गरज भासणार आहे. 26 मे 2014 रोजी पंतप्रधान कार्यालयाचा कारभार हाती घेतल्यानंतर मोदींनी 6 विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने संमिश्र यश मिळवले आहे. 12 मे रोजी कर्नाटकची निवडणूक मोदींची परीक्षा घेणारी ठरणार आहे.