अंबरनाथ । स्वच्छता अभियान अंतर्गत देशभरात काही कोटी रुपये खर्च केले आहेत. लोकांना सार्वजनिक शौचालया बरोबर वैयक्तिक शौचालये सरकारने बाधुंन दिली,मात्र रोजगार नसल्याने आणी भरमसाट महागाई वाढल्याने लोकांवर उपासमारीची वेळ आली,तर शौचालये बांधून त्याचा काय उपयोग असा प्रश्न बहुजन विचारांची नेता सुषमाताई अंधारे यांनी येथे एक कार्यक्रमात उपस्थित केला. त्यापुढे आपल्या भाषणात म्हणाल्या की, भीमा-कोरेगांव येथे स्मृतीस्तंभास अभिवादन करण्यासाठी देशभरातून आंबेडकरी अनुयायी आले होते. त्यांच्यावर जो अमानुष हल्ला झाला. तो पूर्वनियोजित असल्याचे आता सिद्ध झाले आहे, सर्व जाती, धर्म, वर्ग यांना एकत्र बांधून ठेवणे, सर्वांना न्याय, हक्क व समानता देण्याचे काम फक्त आणि फक्त संविधानाने केलेले आहे, आणी सत्ताधार्यानी संविधान बदलण्याची भाषा केली असून जर,तसे केले तर मात्र भारताची जनता यांना सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी शिवाजी फुले शाहू आंबेडकरी सामाजिक संघटना चे अध्यक्ष धनंजय सुर्वे यांनी आयोजित केलेल्या सदर कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलां उपस्थित होत्या, या कार्यक्रमात अंबरनाथमधील 6 महिलांचा सावित्रीच्या लेकी म्हणून जाहीर सत्कार करण्यात आला. येथील शिवाजी फुले शाहू आंबेडकर सामाजिक संघटना आयोजित जागतिक महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतीदिनानिमित्त सवित्रीच्या लेकींचा जागर या कार्यक्रमाचे आयोजन पश्चिमेकडील महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणात अध्यक्ष धनंजय सुर्वे यांनी केले होते. या कार्यक्रमाचे यंदाचे तीसरे वर्षे असल्याचे सुर्वे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या म्हणून बहुजन विचारांची मुलुखमैदानी तोफ असणार्या सुषमाताई अंधारे यांना निमंत्रित करण्यात आले होते. सदरकार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनंजय सुर्वे यांच्यासह रमेश डोंगरे, सचिन घोलप, संजय बन्सल, सुधाकर सरवदे, यांच्यासह महिला, पुरुष पदाधिकारी आणि तरुण, तरुणीसह स्वंयसेवक यांनी अलोट गर्दीला नियंत्रण ठेवण्याचे काम केले.