चोपडा- महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयात स्वतंत्र मायक्रो फायनांन्स प्रा. लि.कंपनी आणि महाविद्यालयातील प्लेसमेंट सेल यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कंपनीकडून अधिकाऱ्यांनी पात्र ९० विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. यात १० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अँड.संदीप सुरेश पाटील, सचिव-डॉ.स्मिता संदीप पाटील, प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली. यावेळी स्वतंत्र मायक्रो फायनांन्स कंपनीचे अधिकारी शेख मगदूम युसुफ,उमाकांत मोरे,सुधाकर डालके, दयानंद माने,तेजस परदेशी व ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल समन्वयक डॉ. कुणाल गायकवाड उपस्थित होते. याप्रसंगी अँड. संदीप पाटील,प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी यांनी मनोगते व्यक्त केलीत. डॉ.आर.आर.पाटील यांनी सूत्र संचालन केले तर आभार प्रा.डी. डी.पवार यांनी मानलेत.