रोज मरे त्याला कोण रडे?

0

रोज मरे त्याला कोण रडे? नाही मी शेतकरी, कामगार, कर्मचारी अधिकारी यांच्याबाबतीत लिहीत नाही, तर मध्य रेल्वेच्या दररोजच्या जीवघेण्या प्रवासाबाबत लिहीत आहे. त्यातील कोणीच कोणाच्या ओळखीचा नसतो. पण दररोजच्या 5.45/7.10/7.56/8.12/ या कर्जत, कसारा, खपोली, टिटवाळा, बदलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या लोकल गाडीने ये-जा प्रवास करणारे अनेक माणसे प्रवासी असतात. त्यातून त्यांची तोंड ओळख झालेली असते. त्यात रंगणारी चर्चा ऐकली, तर पीएचडी करण्यासाठी लागणारे सर्व उपयोगी माहिती या प्रवासात उपलब्ध होऊ शकते.

आपण टीव्हीवर बातम्यामध्ये पाहतोय की मीडियाने महापालिकेच्या अपयशाबद्दल बाऊ केला आहे. कबूल आहे की अनेक शहरांमध्ये पावसाचे पाणी तुंबू नये म्हणून पूर्व नियोजनाचा अभाव होता. यात अनेक महापालिका अपयशी ठरल्यात. पण एक सुजाण नागरिकाच्या भावनेतून वैयक्तिक स्तरावर तुम्ही नाही का अपयशी ठरलात?. दररोजच्या प्रवासातील हा विविध वृत्तपत्र वाचून एकमेकांना तिथेच प्रश्‍न विचारतो आणि उत्तर भी देतो. आम्ही दररोज लोकलने प्रवास करणारे एक गाडी दहा पंधरा मिनिटे लेट झाली तर रेल्वेच्या एकूण प्रशासनाची आई बहीण एक करतो. तेही फक्त जाग्यावर उभे राहून. तेव्हा माझ्यासारखा जास्त शहाणा बोलला चला स्टेशन मास्टरला भेटू, तर कोणालाच वेळ नाही. मध्य रेल्वे असो की पश्‍चिम रेल्वे तिचे दररोजचे दुखणे आहेच. मग लोक म्हणतात रोज मरे त्याला कोण रडे?
राज्यातील अनेक शेतकरी वेगवेगळ्या संघटना, पक्षाच्या नेतृत्वाखाली अनेक जण आंदोलने करून थकली.

दररोज रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांना गाडी कुठे का थांबली याची माहिती असते. ब्रीज, गटार आणि सिग्नल ही गाडी थांबण्याच्या जागा आहेत. त्याला ही सर्व प्रवासी जबाबदार आहेत असे कोणी म्हटले तर ?. तुम्हीच पिण्याच्या पाण्याचा बॉटल, खाद्यपदार्थांचे वेष्टण, प्लास्टिक प्लेट्स आणि चमचे ट्रेनच्या खिडकीतून बाहेर फेकून देता जे नष्ट होत नाही व रेल्वे ट्रॅकच्या ड्रेनेजमध्ये अडकून राहते. ज्यामुळे ट्रॅकवर पाणी साठते व ट्रेन बंद होतात. सायन शिव ते माटुंगादरम्यान ब्रीजखाली कायम रेल्वे लोकल गाड्या धिम्या गतीने धावतात. कारण धारावी झोपडपट्टीतील सांड पाणी मोठ्या प्रमाणात येथे जमिनीत मुरते, पावसाळा असो या नसो इथे रेल्वेची कायमस्वरूपी अडचण आहेच, मग याला दोषी कोण? रेल्वे, महापालिका का तुम्ही-आम्ही? रेल्वे ही सार्वजनिक मालमत्ता आहे. तिचे रक्षण आणि जतन करणे हे भारतीय नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे. पूर्वी माणूस घरातून प्रवासाला निघाला की पाण्याची बॉटल सोबत घ्यायचा. आता काय होते? प्रत्येक वेळी जेव्हा मिनरल वॉटरची बाटली खरेदी करतो. तेव्हा प्लास्टिक कचरा वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावता की नाही. रेल्वेच्या प्रत्येक स्टेशनवर पाणी पिण्याच्या पाऊ बांधल्या आहे, पण त्यात पाणीच नसते.त्याचे काय?. कारण पिण्याचे पाणी प्रयत्न स्टेशनवर मोफत मिळाले तर मिनरल वॉटरची बाटली खरेदी कोण करेल? रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रत्येक माणसाचे प्रवाशांचे कर्तव्य आहे. त्यांनी संघटितपणे भारतीय सार्वजनिक रेल्वेचे रक्षण करण्यासाठी संघटित झाले पाहिजे आणि रोज मरे त्याला कोण रडे? ही भावना सोडून दिली पाहिजे. राजकीय दलाल आणि त्यांचे बगलबच्चे कॉन्ट्रक्टर, ठेकेदार, पोलीस, आरपीएफ मेल एक्स्प्रेसच्या प्रवाशांना उघड उघड मुक्तपणे शोषण करून आर्थिक लूट करतात. त्यांच्याविरोधात लढण्यास कोणी बाहेरचा माणूस किंवा संघटना येणार नाही म्हणूनच प्रवाशांनी संघटितपणे यावर लेखी आवाज उचलल्यास रोज मरे त्याला कोण रडे ही म्हण बदलली जाऊ शकते. बदलाची सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे.

लोकल रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांनी केवळ भजन मंडळ, दरवाजा अडवणार ग्रुप अशी ओळख न राहता असंघटित लोकल रेल्वे प्रवाशांना मदत करणारा संघटित प्रवासी संघ अशी झाली पाहिजे, तरच वेळोवेळी रेल्वेने प्रवासात येणार्‍या अडचणीवर रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून मार्ग काढता येईल. नाही तर रोज मरे त्याला कोण रडे, असेच म्हणत राहावे लागेल.

सागर तायडे
भांडुप,मुंबई
9920403859