रोझोद्याच्या इसमाचा विहिरीत आढळला मृतदेह

0

सावदा- रावेर तालुक्यातील रोझोदा येथील संदीप रामा पाटील (26) या दोन दिवसांपासून बेपत्ता इसमाचा खिरोदा रस्त्यावरील नामदेव कृष्णा फेगडे यांच्या विहिरीत मृतदेह आढळल्याने गावात खळबळ उडाली आहे. फेगडे हे 15 रोजी दुपारी अडीच वाजेपासून घरात कुणाला काही एक न सांगता बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध सुरू असतानाच शुक्रवारी सकाळी त्यांचा विहिरीत मृतदेह आढळला. त्यांनी आत्महत्या केली की अन्य कारणाने त्यांचा मृत्यू झाला? याबाबत माहिती कळू शकली नाही. सावदा पोलिसात संतोष गोवर्धन चौधरी यांनी दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार अशोक साळुंखे करीत आहेत.