निगडी : रोटरी क्लब ऑफ निगडीतर्फे विविध क्षेत्रात काम करणार्या पाच सामाजिक संस्थांना सामाजिक सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार सोहळा आकुर्डी येथे पार पडला. आकुर्डी येथे पार पडलेल्या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष अध्यक्ष सुभाष जयसिंघानी, उपाध्यक्ष विजय काळभोर, हरविंदर दुल्लत, साधना काळभोर, भूषण कुलकर्णी, कमलजित दुल्लत आदी उपस्थित होते. सहगामी फाउंडेशनच्या प्राजक्ता रुद्रवर, उद्योगधाम ट्रस्टचे सुरेशभाई शाह, स्पर्श बालग्राम महेश यादव, स्नेहवनचे संस्थापक अशोक देशमाने, संकल्प चॅरिटेबल फाउंडेशनचे जयसिंग शंकर हिरे यांना सामाजिक सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सुभाष जयसिंघानी म्हणाले की, समाजसेवा हा रोटरीचा मुख्य उद्देश आहे. यालाच साथ देत समाजाच्या विविध क्षेत्रात समाजसेवेचे काम करणार्या संस्थांना प्रोत्साहन देणे ही सध्या काळाची गरज आहे. त्यामुळे आदर्श संस्था चालकांचा सन्मान करायला हवा. त्यातूनच हे सामाजिक सेवा पुरस्कार देण्यात येत आहे. यामुळे समाजसेवेचे हात आणखी बळकट होणार आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.आर.रंगनाथन, सुजाता ढमाले यांनी केले. तर आभार विजय काळभोर यांनी मानले.