रोटरी क्लबतर्फे अव्हेन्यू अवॉर्ड वितरण

0

चाळीसगाव । चाळीसगाव सह. औद्योगिक वसाहतीत बजाज सिमेंट प्रोडक्ट येथे लालचंद व सौ कमला बजाज यांचा विवाह सोहळा सुवर्ण महोत्सव साजरा करून रोटरी इंटरनॅशनल कडून त्यांना अव्हेन्यूज ऑफ सर्व्हिसेस सायंटेशन अवॉर्ड पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी वासुदेव मुंडियाल यांना त्यांच्या सामाजिक कार्यामुळे रोटरीतर्फे जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. यावेळी व्यासपीठावर रोटरी अध्यक्ष मेघा बक्षी, सचिव डॉ संतोष मालपुरे, लालचंद व कमला बजाज, प्रा.डी.के. शिंदे, गणेश महाजन, नगरसेवक नितीन पाटील, मालती जगताप उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी केले.

यांची होती उपस्थिती
प्रा. चंद्रकांत ठोंबरे, अविनाश सूर्यवंशी, प्राचार्य डॉ.बाविस्कर राजेंद्र चिमणपुरे यांनी बजाज यांच्या कार्याचा गौरव केला. दीपक पाटील, निर्मला पवार, रमेश पोतदार, श्रावणी कोटस्थाने, स्नेहल सपणर यांनी गाणी सादर केली. यावेळी नितीन पाटील यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात कारखानदार, उद्योजक, व्यापारी, डॉक्टर, वकील, इंजिनिअर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाद्वारे फेलोशिप, फ्रेंडशिप, उत्कृष्ट कार्याचा गौरव व रोटरीचे ध्येय साध्य करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना वेद मूर्ती पंडित श्रीराम आचार्य लिखित गायत्री परिवाराची पुस्तके प्रसाद म्हणून मोफत देण्यात आली.