रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे पुस्तकांचे वाटप

0

चिंचवड :- रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे पिंपरी-चिंचवड शहरातील विविध शाळांना क्रांतीकारकांची माहिती असलेली, विज्ञानाची माहिती असलेल्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना तब्बल दोन हजार पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी आणि क्रांतीकारकांचे विचार, विज्ञान याची माहिती व्हावी या उद्देशाने मोहननगर, येथील क्रांतीवीर सावित्री फुले संस्थेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यामध्ये क्रांतीकारक यांची माहिती असलेले पुस्तके, वैज्ञानानिक माहिती, गमती-जमती, गोष्टीच्या पुस्तकेच देण्यात आली आहेत. यावेळी रोटरी क्लब ऑफ आकुर्डीच्या अध्यक्षा उज्ज्वला जोशी, प्रकल्प अधिकारी रवी नामदे, शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री निंबाळकर, मारुती बहिरवाडे आदी उपस्थित होते.