रोटरी वेस्टचा पदग्रहण उत्साहात

0

जळगाव। येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट या क्लबचा पदग्रहण सोहळा शुक्रवार 14 जुलै रोजी सायंकाळी मायादेवी नगरमधील रोटरी भवन येथे उत्साहात पार पडला. रोटरी डिस्ट्रीक्ट 3140 चे माजी प्रांतपाल डॉ.उल्हास कोल्हटकर यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.

नूतन अध्यक्ष अ‍ॅड.सुरज जहाँगीर यांना योगेश भोळे यांनी तर मानद सचिव कृष्णकुमार वाणी यांना संजय इंगळे यांनी कॉलर, पीन, चार्टर प्रदान करून पदभार सुपूर्द केला. नूतन कार्यकारिणीतील आय.पी.पी. योगेश भोळे, व्हाईस प्रेसिडेंट, किरण कक्कड, प्रेसिडेंट इलेक्ट संगीता पाटील, सहसचिव राजेश परदेशी, कोषाध्यक्ष अनुप आसावा, सार्जंट ऍट आर्मस सचिन मराठे, कार्यकारिणी सदस्य म्हणून डॉ.राजेश पाटील, विनोद बियाणी, अ‍ॅड.राहूल लाठी, निखील बियाणी, अरूप नंदर्षी, केकल पटेल, अनिल कांकरिया तसेच सल्लागार डॉ.अरूण बगडिया, रमण जाजू, अनिल बोरोले, संदीप काबरा, गनी मेमन, नितीन रेदासनी, किरण राणे, अनंत भोळे, सुनिल अग्रवाल, चंद्रकांत सतरा यांच्यासह आदी सदस्यांचा सत्कार करण्यात आला.