आर्थिकतज्ञ अभय नागर यांचे मार्गदर्शन
जळगाव । येथील रोटरी वेस्टतर्फे गुंतवणूक जागरुकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुंबई येथील आर्थिक क्षेत्रातील तज्ञ अभय नागर यांनी मार्गदर्शन केले. ‘डोंट मेक मनी, क्रिऐट वेल्थ’ या विषयावर नागर यांनी इक्विटी, म्युच्युल फंड योग्य पर्याय गुंतवणूकीसाठी असल्याचे सांगून इक्विटी समजून घ्या, दीर्घकालीन गुंतवणूक करा, गरज नसलेल्या किंवा शिल्लक पैशातून गुंतवणूक करा, गर्दीमागे धावू नका, सार्वजनिक ठिकाणी किंवा पार्टीमध्ये गुंतवणूकीची चर्चा करु नका, मोहाला बळी पडू नका अशा टिप्स नागर यांनी दिल्या.
‘डोंट मेक मनी, क्रिऐट वेल्थ’ या विषयावर चर्चा
अमळनेर येथील विप्रो कंपनीमुळे गुंतवणूकदारांना गेल्या 20 वर्षात 40 कोटींचे आज 8 हजार कोटी कसे झाले. याची यशोगाथा त्यांनी सांगितली. देशात संध्या सामाजिक, आर्थिक, राजकिय परिवर्तनामुळे अर्थव्यवस्थेला भविष्यात सुवर्णकाळ येणारअसून भावीपीढीसाठी तरुणांनी आज अगदी 500 रुपयांपासून एसआयपीमध्ये गुंतवणूक करावी, असे आवाहन केले. प्रारंबी नागर यांचे स्वागत रोटरी वेस्टचे माजी अध्यक्ष अनिल बोरोले तर अध्यक्ष अॅड.सुरज जहाँगीर यांनी सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रकल्प प्रमुख विश्वेश स्वर्णकार यांनी तर आभार मानद सचिव कृष्णकुमार वाणी यांनी मानले. यशस्वीतेसाठी सुनील सुखवाणी, रिंकल कोठारी आदींसह रोटरी वेस्टच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.