जळगाव । येथील रोटरी क्लब ऑफ जळगांव वेस्ट आणि आरटीओ विभागातर्फे शहरातील 250 रिक्षाचालकांची विनामुल्य आरोग्य तपासणी करण्यात आली. या उपक्रमांस गणपती हॉस्पीटलचे सहकार्य लाभले. याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, मोटरवाहन निरीक्षक कमलेश चव्हाण, निशीकांत वैद्य, शेखर आचार्य, अतुल भागवत, राकेश रावते, राकेश शिरसाठ, रोटरी वेस्टचे अध्यक्ष योगेश भोळे, मानद सचिव संजय इंगळे, माजी सहप्रांतपाल गनी मेमन, गणपती हॉस्पीटलचे डॉ.शितल ओसवाल, डॉ.कल्पेश गांधी, डॉ.अर्जुन साठे आदीसह सर्व रिक्षा युनियनच्या पदाधिकार्यांची प्रमुख उपस्थिती होती.
गरजेनुसार शासकीय योजनेतून शस्त्रक्रिया
आरटीओ व रोटरी वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात प्रथमच रिक्षाचालकांची विनामुल्य आरोग्य तपासणी आयोजित करण्यात आली आहे. रिक्षाचालक बारा तास अथक परिश्रम करतात मात्र आरोग्याकडे लक्ष देत नाही त्यांच्या आरोग्यासाठी व कुटुंबीयांच्या कल्याणासाठी हा उपक्रम आयोजित केल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले. याप्रसंगी कमलेश चव्हाण, गनी मेमन, डॉ.शितल ओसवाल यांनीही मार्गदर्शन केले. गरज भासल्यास शासकीय योजनेतून शस्त्रक्रिया देखील करून देण्याचा आयोजकांचा मानस असल्याचे सांगितले. यशस्वीतेसाठी रिक्षा युनियनचे दिलीप सपकाळे, विलास ठाकूर, भानुदास गायकवाड, रज्जाकभाई, जमिलभाई, शशिकांत जाधव, रणजित नाईक, अशोक पाटील आदिसह रिक्षाचालकांनी कामकाज पाहिले.