जळगाव – अमळनेर तालुक्यातील गोवर्धन शेतशिवारातील चाळीस हजार रूपये किंमतीचे जूने रोटोव्हेटर अज्ञात चोरटयाने चोरून नेले होते. याप्रकरणी मारवड पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत माहिती अशी की, राजेंद्र नारायण पाटील रा. गोवर्धन ता. अमळनेर यांच्या शेतशिवारात ट्रक्टरचे रोटोव्हेटर चाळीसहजार रूपये किंमतीचे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. याप्रकरणी मारवड पोलीस स्टेशनला भाग 5 गुरनं 35/2018 भादवी कलम 379 प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल कुऱ्हाडे यांनी एक पथक तयार करून अमळनेर व चोपडा भागात रवाना केले होते. एलसीबीच्या पथकला आरोपी यशवंत रघुनाथ कोळी रा. अडावद ता.चोपडा यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने वरील गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्या ताब्यातील 40 हजार रूपये किंमतीचे रोटोवेटर हस्तगत केले असून पुढील कारवाईसाठी आरोपीस मारवड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पथकातील पोहेकॉ नारायण पाटील, सफौ नुराद्दिन शख, किरण चौधरी, रामचंद्र बोरसे, बापु पाटील, मनाजे दुसाने, योगेश पाटील, दत्तात्रय बडगुजर, सुशिल पाटील, प्रविण हिवराळे, दिपक पाटील यांनी ही कारवाई केली.