रोट्रॅक्ट क्लब ऑफ जळगावचा अभिनव उपक्रम

0

शैक्षणिक स्तरावर राबविला उपक्रम

जळगाव: रोट्रॅक्ट क्लब ऑफ जळगाव ने गणपती बाप्पा उत्सव चे अवचित्य साधून शहरातील विविध शाळेत जनरल नॉलेज परीक्षा घेऊन राबविला उपक्रम. शहरातील हरीविठ्ठल येथील जिजामाता हायस्कुल, मेहरून येथील वाय डी पाटील हायस्कुल,शिरसोली येथील जिजामाता हायस्कुल ह्या शाळांमधील ५११ विद्यार्थ्यांनी दिली एकाच वेळी जनरल नॉलेज ची परीक्षा दिली.

ह्या शाळांमधील ७वि ते १०वि च्या सर्व विध्यार्थीनि ही परीक्षा दिली. वाय डी पाटील शाळेतील निखिल मसुले, शेख फैजन शेख, साहिल शेख सलीम, मयूर सांगळे, जिजामाता हायस्कुल येथील प्राची गोरडे, नंदिता चव्हाण, शुभांगी मोरे, तेजस्विनी शेकोकर, शिरसोली शाळेतील अविनाश सपकाळे, रोशन केला,परेश पाटील, उमेश सपकाळे ह्या शाळेतील हे विद्यार्थी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय व चतुर्थ स्थानी आले. सर्व विजेत्या स्पर्धकांना रोट्रॅक्ट तर्फे प्रस्तीपत्र व बक्षीस म्हणून श्याम चे आई चे पुस्तक म्हणून देण्यात आले. या प्रसंगी रोट्रॅक्ट चे जयवर्धन नेवे, पारस जैन, अदयक्ष आशना तडवी, सचिव पूजा गजरे, पंकज जैन, देवेश दोषी यांची उपस्थिती होती । तसेच जिजामाता हायस्कुल चे खोरखोडे सर व वाय डी पाटील येथील खांबयात सर यांची उपस्थिती होती.