रोनाल्डोवर कर चुकविल्याचा ठपका

0

माद्रिद । रिअल माद्रिद फुटबॉल क्लबचा अव्वल दर्जाचा खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोवर कंपन्यांमधील गुंतवणूक करताना 14.70 कोटी युरो रकमेइतका कर चुकवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

माद्रिद येथील सरकारी वकिलाने याबाबत पत्रकात म्हटले आहे की, “पोर्तुगीजच्या या खेळाडूविरुद्ध चार फौजदारी खटले दाखल करण्यात आले आहेत. 2011 ते 2014 या कालावधीत रोनाल्डोने त्याला मिळालेल्या मानधनाची रक्कम विविध कंपन्यांमध्ये गुंतवली. गुंतवणूक करतानाही नियमावलींचा भंग केला आहे.मेस्सी व त्याच्या वडीलांना तुरूंगवास भोगावा लागला होता.