रोहिणीच्या विवाहितेचे बसमधून मंगळसूत्र लंपास

0

चाळीसगाव – गर्दीचा फायदा घेवुन अज्ञात चोरट्याने तालुक्यातील रोहिणी येथील महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र 7 रोजी दुपारी 3.30 ते 3.45 वाजेदरम्यान चाळीसगाव ते खडकी बु.॥ दरम्यान बसमधून लंपास करण्यात आले. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहिणीच्या नंदाबाई वाल्मिक नागरे या 7 रोजी चाळीसगाव येथे बाजार करण्यासाठी आल्या होत्या बाजार आटोपुन रोहिणी येथे घराकडे जाण्यासाठी त्या शहरातील हिरापुर रोडवरील हॉटेल लिलाजजवळ नांदगाव डेपोच्या चाळीसगाव नांदगाव बस मध्ये दुपारी 3-30 वाजेच्या सुमारास चढल्या त्यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. 3-45 वाजेच्या सुमारास बस खडकी बु येथे पोहोचल्यावर त्यांनी गळ्यातील मंगळसूत्र पाहिीले असता ते दिसले नाही बस मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवुन अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 7 ग्रॅम वजनाचे 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरुन नेले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला त्यांचे पती वाल्मिक दयाराम नागरे (55, तहसीसल आवार स्टँप वेंडर रोहिणी) यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार राजेंद्र चौधरी करीत आहेत.