रोहिणी खडसेंविरोधात गुन्हा दाखल करा : शिवसेनेची भुसावळ विभागात मागणी

आमदारांना चोपण्याच्या चिथावणीखोर वक्तव्याचे दुसर्‍या दिवशी भुसावळ विभागात पडसाद ः शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी

भुसावळ :  मुक्ताईनगरातील आमदार चंद्रकांत पाटील यांना चोपण्याची भाषा जिल्हा बँक संचालक तथा माजी मंत्री खडसे यांच्या कन्या अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी केल्यानंतर या वक्तव्याचे रविवारी भुसावळ विभागात पडसाद उमटले. तालुकास्तरावर शिवसेना पदाधिकार्‍यांनी पोलिस प्रशासनाला निवेदन देत अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. गुन्हा दाखल न करण्यास आल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

आमदारांबाबत केलेले वक्तव्य न शोभणारे
मुक्ताईनगर : सोशल मिडीयातील वादानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात धिंगाणा घालण्यात आला तसेच तीन लाख लोकांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या आमदाराला चोपण्याची चिथावणीखोर भाषा अ‍ॅड.रोहिणी खडसे यांना शोभणारी नसल्याचे निवेदन शिवसेना व युवा सेनेतर्फे पोलिस प्रशासनाला देण्यात आले. प्रसंगी तालुकाप्रमुख छोटू भोई, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, जीवराम कोळी, शिवाजी पाटील, नवनीत पाटील, शहरप्रमुख प्रशांत टोंगे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख पंकज राणे, उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे, राजेंद्र हिवराळे, नगरसेवक पियुष मोरे, मुकेशचंद्र वानखेडे, संतोष कोळी, निलेश शिरसाट, आरीफ आझाद, युनूस खान, संतोष मराठे, वसंत भलभले, विठ्ठल तळेले, गोपाळ सोनवणे, अमरदीप पाटील, नरेंद्र गावंडे, शकुर जमदार, मुशीर मनियार, जहीर खान , सलीम खान, जाफर अली, दीपक पवार , सचिन पाटील, संतोष माळी, स्वप्नील श्रीखंडे, जितेंद्र मुर्हे, सोपान मराठे, गौरव दुट्टे, राजू बंगाळे, राजू थिटे, तानाजी पाटील, चेतन कांडेलकर, पप्पू मराठे, दीपक खुळे, आकाश सापधरे, सुमेरसिंग राजपूत ,चेतन पाटील, विक्रमसिंग राजपूत आदींची उपस्थिती होती.

रोहिणी खडसेंना आत्मपरीक्षणाची गरज : शिवसेना महिला आघाडी
मुक्ताईनगर : विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांचा विजय झाल्यानंतर न पचलेल्या पराभवातून प्रचंड घ्रुणा मनाशी बाळगून असलेल्या अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्याविरोधात तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन शिवसेना महिला आघाडीतर्फे देण्यात आले. यावेळी प्रचंड घोषणाबाजी महिला आघाडीतर्फे करण्यात आली. यावेळी महिला आघाडी जिल्हा संघटक कल्पनात पालवे, उपजिल्हा संघटक सुष्मा शिरसाट, तालुका संघटक शोभा कोळी, शहर संघटक सरीता कोळी, सुनीता तळेले, यशोदा माळी, उज्वला कुंभार, नगरसेविका नुसरत बी.मेहेबूब खान, नगरसेविका सविता भलभले, शबाना बी.अब्दुल आरीफ, ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य अनिता मराठे, ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य सुनीता सोनवणे, अलका कांडेलकर , सविता बाविस्कर, दुर्गा मराठे, भारती भोई, भारती हिवराळे, आशा जयकर, वर्षा घुले, अलका मराठे , धनश्री पाटील, ज्योती मालचे आदींसह असंख्य महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

गृहमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
शिवसैनिकाला घरासमोर बोलावले व मारहाण करण्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे शिवाय रात्री तीन वाजेपर्यंत पोलिस स्टेशनला थांबून मंत्र्यांद्वारे दबाव टाकून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले व वरून मुक्ताईनगरात महिला सुरक्षित नसल्याचा कांगावा करणे म्हणजे राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह नाही का ? असा सवाल महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. आमदारांना मारहाण करण्याची भाषा करणे ही गुंडगिरीच असून माजी मंत्री खडसे यांनी अंजली दमानिया यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य काढले तेव्हा तुम्ही टाळ्या वाजवल्या, तेव्हा तुमच्यातील महिलांविषयी सहानुभूती कुठे गेली होती? असा प्रश्न शिवसेना शहर संघटिका सरीता कोळी यांनी उपस्थित केला तर अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी त्यांच्या समर्थकांनाच आळा घालावा, अशी भावना शिवसेनेचे अल्पसंख्यांक पदाधिकारी शकुर जमदार यांनी व्यक्त केली.

बोदवडला पोलिस प्रशासनाला निवेदन
बोदवड : चिथावणीखोर वक्तव्य करणार्‍या अ‍ॅड.रोहिणी खडसेंविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बोदवड येथे पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. गुन्हा दाखल न करण्यात आल्यास शिवसेनेतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. निवेदन देताना तालुकाप्रमुख गजानन खोडके, तालुका संघटक शांताराम कोळी, अल्पसंख्यांक उपजिल्हा संघटक कलीम शेख, शहरप्रमुख हर्षल बडगुजर, शहरप्रमुख राहुल शर्मा, गोपाळ पाटील, सईद बागवान, नगरसेवक आनंदा पाटील, नगरसेवक नितीन चौहान, नगरसेवक सुनील बोरसे, नगरसेवक देवेंद्र खेवलकर, नगरसेवक धनराज गंगतीरे, नगरसेवक अकबर बेग, नगरसेवक संजय गायकवाड, नगरसेवक सलीम कुरेशी, नगरसेवक दिनेश माळी, असलम शेख, समाधान तायडे, जितेंद्र पाटील, तानाजी पाटील, विनोद पाडर, गजानन बोंडेकर, सुरेश पाटील, गोलू बरडीया, निलेश माळी, शरीफ मण्यार, अमोल व्यवहारे, पवन माळी, मनोज पाटील, भूषण भोई, सचिन भोई, योगेश भोई, अप्पू भांजा, समीर शेख, नामदेव पाटील, आनंदराज खोडके व शिवसैनिक उपस्थित होते.

सावद्यात शिवसेना पदाधिकारी संतप्त
सावदा : अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्या वक्तव्याचा स्थानिक शिवसेना पदाधिकार्‍यांनी निषेध केला. सावदा पोलिस प्रशासनाला अ‍ॅड.खडसे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. या निवेदनावर शहराध्यक्ष सुरज परदेशी, भरत नेहेते, धनंजय चौधरी, विश्वनाथ माळी, सुनील चौधरी, शाहरुख तडवी, अशरफ तडवी, सुभाष सपकाळे, गणेश माळी, किरण गुरव यांच्यासह अनेक शिवसैनिक यांच्या स्वाक्षर्‍या आहेत,

वरणगावात शिवसेना पदाधिकार्‍यांची जोरदार घोषणाबाजी
वरणगाव : जिल्हा बँक संचालक अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना पदाधिकार्‍यांनी रविवारी वरणगाव पोलिस प्रशासनाला निवेदन देत या वक्तव्याचा घोषणाबाजी करून जोरदार निषेध नोंदवला. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, जिल्हा संघटक विलास मुळे, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, मुस्लिम समाजाचे नेते सय्यद जाफर अली उर्फ हिप्पीसेठ, उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी, युवा सेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा, संतोष माळी, आबा सोनार, प्रल्हाद माळी, अमर सोनार, अतुल पाटील, मितेश पाचपोळ, प्रकाश कोळी, सम्राट पाटील, सुनील भोई, उल्हास भारसके, विजय पाटील, नितीन पाटील, कृष्णा पाटील, किरण माळी, पवन चौधरी, दिपक बढे, भूषण राणे, कृष्णा पुजारी, विलास पाटील, गिरीश माळी, साईचरण चौधरी, हर्षल वंजारी, यशवंत बढे, उमाकांत झांबरे, निलेश काळे, योगेश कोळी, सुधाकर चौधरी, विलास पाटील, प्रभाकर पाटील, सुभाष चौधरी, किशोर कोळी, रमेश सुरवाडे, प्रवीण पाटील, राहुल वंजारी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.