ग्रामीण पोलीसात चौघांवर गुन्हा दाखल
चाळीसगाव – मोटारसायकलचा कट का मारला याचा जाब विचारल्याचा राग येवुन मुलाच्या डोक्यात बापाच्या हातावर लोखंडी ॲंगल मारल्याने मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना २४ सप्टेंबर २०१८ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास तालुक्यातील रोहिणी येथील मारुती मंदीराजवळ घडली असुन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन जखमीवर शहरातील देवरे हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुधाकर मोतीराम घुगे (वय- ४१) रा.रोहिणी ता. चाळीसगाव यास आरोपी सुरज ज्ञानदेव दिघोळे रा रोहिणी ता चाळीसगाव याने मोटारसायकलचा कट मारल्याने त्यास याचा जाब विचारल्याचा राग येवुन त्याने सुधाकर घुगे यांच्या डोक्यात लोखंडी अँगल मारुन गंभीर जखमी केले तर संदीप ज्ञानदेव दिघोळे याने पकडुन ठेवले मोतीराम घुगे हे मुलाला सोडवण्यासाठी गेले असता शशीकांत दिघोळे याने त्यांच्या हातावर लोखंडी अँगल मारुन जखमी केले व आरोपी राहुल उत्तमराव वाघ याने सायकलची चैन सुधाकर घुगे यांच्या खांद्यावर मारुन शिवीगाळ केली व तुम्ही आमच्या नादी लागले तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याप्रकरणी वरील चार आरोपीविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास पोलीस नाईक महेंद्र साळुंखे करीत आहेत.