मुंबई । मुंबई इंडियंस संघाचा कर्णधार रोहित शर्माला आयपीएल आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. मात्र असे असले तरी सामना पंच यानी फक्त रोहितला तंबी देवून सोडून दिले. हा प्रकार रविवारी मुंबई इंडियस व कोलकत्ता नाइटराइडर्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर सामना सुरू ंहोता. या सामन्यावेळी मुंबई संघ खेळत होता. त्यावेळेस रोहित शर्मा फलंदाजी करित होता. त्यावेळी पंच यानी रोहितला बाद दिले.या निर्णयाला रोहित शर्माने विरोध दर्शविला.त्याच्या हावभाववरून त्यांचा राग व्यक्त होत होता. यानंतर सामना पंच यांनी रोहित शर्मा याला या वर्तनाबद्दल निदा केली व त्याला आशा वर्तनाबद्दल तंबी दिली. त्यानंतर रोहित शर्मा याला चेतावणी देवून सोडून दिले.
केकेआरचा सलामीवीर क्रिस लिन दुखापतग्रस्त
मुंबई । वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन व कोलकत्ता नाईटराइडर्स याच्या सामना झाला. या सामन्यावेळी केकेआरचा सलामीवीर क्रिस लिन जायंबदी झाला. मुंबई इंडियनसचा सलामीवीर जॉस बटलर यांचा झेल पकडण्याचा प्रयत्न करित होते.त्यावेळेस त्याच्या खांदा दुखापतग्रस्त झाला.त्यावेळेस त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले.त्यामुळे पुढील सामने खेळू शकेल नाही यावर प्रश्न उपस्थित झाले आहे. मुंबई इंडियस खेळत असतांना चौथ्या षटकात सलामीवीर फलंदाज जॉस बटलर याने क्रिस वोक्सच्या चेडूवर मिड ऑफवर खेळला.त्याठिकाणी क्षेत्ररक्षण करित असलेले क्रिस लिन हा जॉस बटलर याचा झेल पकडण्याचा प्रयत्न केला असला तो अयशस्वी झाली.या सामन्यात मुंबई इंडियस ने केकेआरला 1 चेंडू व 4 गडी राखून पराभूत केले.क्रिस लिन ने आपल्या आक्रमक फलंदाजीचा परिचय दिला आहे.या आयपीएलमध्ये चांगल्या धावा बनविल्या आहे. त्यामुळे तो सध्या सर्वाधिक धावा बनविणार्या फलंदाजच्या क्रमवारीत सर्वात वरच्या स्थानावर आहे.त्याने दोन सामन्यात 125 धावा केल्या आहे.त्यामध्ये सर्वात चांगला धावा 93 नाबाद आहे.यापुर्वी ही या आयपीएलमध्ये अनेक महान खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहे. त्यामुळे ते या आयपीएलमध्ये खेळू शकत नाही आहे.यात भारतीय कर्णधार विराट कोहली, स्पिनर रविचंद्रन आश्विन,लोकेश राहुल, दक्षिण अफ्रीका एबी डिविलियर्स, जीपी पॉल डुमिनी, डी कॉक, याचा सहभाग आहे.
रोहित व धोनीला मिळाली तंबी
रोहित शर्माने या सामन्यात 2 धावावर खेळत असतांना सुनील नरेन याच्या गोलंदाजीवर बाद झाला. नरेन याने त्याला पायचित करून तंबूत परत पाठविले.यानंतरही मुंबई इंडियसने हा सामना 4 गड्यांनी विजय मिळविला. या जोरदार विजयानंतर मुंबई इंडियसचा आत्मविश्वास वाढला आहे. यापुर्वी भारतीय संघाचा माजी कर्णधार राइजिंग पुणे सुपरजायंटसचा खेळाडू महेंद्रसिंह धोनीला ही आयपीएलच्या सामन्यात पंचाकडून तंबी देण्यात आली आहे. धोनीने त्या सामन्यात पंचाकडे पाहून डीआरएस घेण्याचा इशारा केला होता. त्यानंतर आयपीएल आचार संहिताचा भंग केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरला.या दोन्ही खेळाडूंना कोणताचा आर्थिक दंड लावण्या आला नाही तर त्याच्या सामना मानधानातून कोणतीही दंड कापण्यात आला नाही.