The market was stopped after the sale of cattle was protested by the protestors सावदा : गुरांवर आलेल्या लंपी आजाराच्या पार्श्वभूमीवर सावद्यात दर रविवारी भरणार्या गुरांचार बाजार भरवण्यास जिल्हाधिकार्यांनी मनाई केली होती मात्र रविवारी परराज्यातील व्यापारी मोठ्या प्रमाणावर सावद्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी कृउबा गाठली मात्र बाजार भरवण्यास मनाई असल्याची माहिती मिळाल्यानंतर व्यापार्यांनी बाजार समितीच्या बाहेरच अनधिकृत बाजार भरवला. या प्रकाराची माहिती शहरातील जागृत पत्रकारांनी संबंधित प्रशासनाला दिल्यानंतर तातडीने सूत्रे हलली व व्यापार्यांना कारवाईचा इशारा दिल्यानंतर गुरांची विक्री थांबली.
परजिल्ह्यातील व्यापारी दाखल
लंपी आजाराच्या अनुषंगाने जळगाव जिल्हाधिकार्यांनी सावदा येथे दर रविवारी कृउबा भरणार्या गुरांच्या बाजाराला पुढील आदेश येईपर्यंत मनाई केली होती मात्र ही बंदी झुगारून अनेक परजिल्ह्यातील व्यापारी सावद्यात रविवार, 7 रोजी दाखल झाले होते. परराज्यातून आलेल्या म्हशीच्या व्यापार्यांनी बाजार बंद राहणार असल्याची भूमिका मांडली मात्र या व्यापार्यांना बाजार समितीत प्रवेश देण्यात न आल्याने त्यांनी बाजार समिती समोर असलेल्या खुल्या जागेतच गुरांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरू केला. ही माहिती शहरातील जागृत पत्रकारांनी कृउबा प्रशासनास कळविली. बाजार समिती सचिव नितीन महाजन, सावदा मुख्याधिकारी किशोर चव्हाण, सचिन चोळके, विनय खक्के आदींनी पोलिसांना सोबत घेत व्यवहार थांबवले.
आदेश आल्यानंतर होणार विक्री
प्रसंगी कृउबा प्रशासनाने व्यापार्यांना तंबी देत जनावरे लागलीच परत नेण्याच्या सूचना केल्या. यावेळी बाजार समिती सचिव नितीन महाजन यांनी सांगितले की, बाजार समितीत जी गुरे आहेत त्यांना रविवारच लंपीची लस देण्यात आली असून नवीन जनावरे विक्रीसाठी येऊ दिली जात नसल्याचे सांगितले. पुढील आदेश आल्या नंतर व्यवहार सुरू होतील, असेही त्यांनी सांगितले.