पाचोरा। जळगावहून पाचोर्याकडे जाणार्या खाजगी लक्झरी बसने माहेजी येथील वृध्द महिला सुमनबाई शिंदे नांद्रा येथे जात होत्या. नांद्रा बसस्थानकावर सकाळी 8 च्या सुमारास सुरक्षीत उतरुन रस्ता ओलांडतांना ज्या लक्झरीतुन उतरल्या त्याच लक्झरीने धडक दिल्याने महिलेचा जागीच मृत्यु झाला. जळगाव हुन नांद्रा येण्यासाठी खासगी लक्झरी श्री.सप्तश्रुंगी क्रमांक एम.एच.19 जे. 1554 ने प्रवास करीत होत्या. रस्ता ओलांडतांना लक्झरीने धडक दिल्याने त्या चाकाखाली आल्या. त्यातच त्यांचा मृत्यु झाला. मात्र कंडक्टर व वाहन चालकाचे सुमनबाईकडे लक्ष नव्हते. पाठीमागुन येणार्या परिवहन महामंडळाची बस येत असल्याचे पाहून ड्रायव्हरने घाई केल्याने महिलेला जिव गमवावा लागला.
सुमनचा मुलगा रेल्वेत नोकरीला
मयत सुमनबाई यांचे पती माहेजी रेल्वे स्थानकावर नोकरीस होते. त्यांचा अपघाती निधन झाल्याने त्यांच्या जागी मुलगा शंकर शिंदे हा रेल्वेत अनुकंपावर भरती झाला होता. शंकर हा सध्या बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे कार्यरत आहे. तो दुपारी पाचोरा येथे पोहचलेल्याने शवविच्छेदनास विलंब झाला. नांद्रा पोलीस पाटील किरण तावडे यांच्या खबरी वरुण अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अपघातानंतर ड्रायव्हर व किंन्नर फरार झालेले होते.
अवैध वाहतूकीने घेतला बळी
पाचोरा दरम्यान सुरु असलेल्या खासगी अवैध वाहतुक विना परवानगी सुरु आहे. पोलिस व परिवहन विभागाच्या आर्थिक हितसंबंधाने ही वाहतूक चालत असल्याची चर्चा परीसरात सुरू आहे. अवैध वाहतुक वाढल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महिलेचा मृत्यु देखील अवैध वाहतुकीमुळे झाला आहे. सकाळी 8 वाजता घडलेल्या घटनेची सावधनपणे कार्यवाही सुरु होती.
पॅनकार्ड वरुन पटली ओळख
अपघातात मयत झालेली महिला ही पतीच्या नोकरी निमित्त जळगाव तालुक्यातील माहेजी येथे वास्तव्यास होती. घटनास्थळी महिले जवळ पॅनकार्ड आढळून आल्याने मयत महिलेची ओळख पटली. त्यानंतर लागलीच घटनेची माहिती नातेवाईकांना कळविण्यात आली. महिला ही नांद्रा येथे नातेवाईकांकडे जात होती.
वाहन तोडफोड टळली
अपघाताची माहिती सर्वत्र पसरल्यानंतर घटनास्थळी बघ्याची गर्दी झाली. नांद्रा येथील सरपंच विश्वभर सुर्यवंशी व पोलीस पाटील किरण तावडे यांनी घटना स्थळी भेट देत जमावाला शांत करुण वेळीच वाहन पाचोरा पोलीसाच्या ताब्यात दिली. त्यामुळे वाहनाची कोणतीही तोडफोड झाली नाही. सुमनबाई शिंदे यांना 108 गाडी बोलवून पाचोरा नगरपालीकाच्या रुग्णालतात दाखल करण्यात आले. टनेची माहिती नातेवाईकांना कळविण्यात आली. महिला ही नांद्रा येथे नातेवाईकांकडे जात होती.