लगान सिनेमातील अभिनेता टिपू उर्फ अमीन गाझी 1 ऑगस्ट रोजी अमळनेरात

0

अमळनेरातून सातपुड्यातील हिंदू मुस्लिम एकतेच्या ताजोद्दीन बाबांच्या उरूसला भेट देणार

अमळनेर- सुप्रसिद्ध सिने अभिनेता आमिर खान यांच्या लगान सिनेमात टिपू ची भूमिका साकारणारा बालकलाकार तथा हंगामा सिनेमात अभिनयाची वेगळी छाप पडणारा सिने अभिनेता आमिन गाझी हा 31 जुलै रोजी अमळनेर नगरीत मुक्कामी येत असून 1 ऑगस्ट रोजी अमळनेर येथून सातपुड्यातील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या ताजोद्दीन बाबा व खुपसदेव महाराजांच्या यात्रेला तो भेट देणार आहे. अमळनेर येथील रहिवासी तथा आमिर खान यांचे बॉडीगार्ड म्हणून काम पाहिलेले रवि भोई यांचा अमीन गाझी हा मित्र असून त्यांचे पारिवारिक संबध देखील आहे. त्यांच्याच विनंती वरून अमिन अमळनेर येथे येत आहे.यासाठी माजी नगरसेवक सुरेश सखाराम चौधरीं यांचे व गुलाम नबी,शेरखा पठाण यांचे अनमोल सहकार्य लाभणार आहे. अमीन याची लगान सिनेमातील बाल कलाकारांची भूमिका प्रचंड गाजली होती,तेथून त्याच्या कॅरिअर ला सुरुवात होऊन त्यानंतर हंगामा,स्टम्फ,मातृभूमी,तौबा तौबा,हाथी का अड्डा,फिर से तौबा तौबा,सांचा,तसेच खेलेंगे हम जी जान से,आदी सिनेमात त्याला प्रमुख व काही दुय्यम भूमिका मिळाल्या या सर्व सिनेमात त्याने उत्तम अभिनय करून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.आता त्याची प्रमुख भूमिका असलेला प्रतिष्ठा नामक सिनेमाचे शूटिंग सुरु असून लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

चाहत्यांमध्ये उत्साह
प्रसिद्ध अभिनेता अमीन गाझी प्रत्यक्ष अमळनेर येथे येत असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. ताजोद्दीन बाबांच्या यात्रेत भाविक व तारुणांबरोबर बराच वेळ तो असणार असून वैजापूर येथे भाविकांना फळे व पाणी बॉटल वाटप करणार आहे. त्याच्यासोबत रवि भोई व त्यांचा अमळनेर येथील मित्र परिवार देखील सहभागी होणार आहे.अमीन च्या आगमनानिमित्त रवि भोई यांना चेतन सुरेश चौधरी,प्रताप चौधरी,परेश सोनार, हरीश गुजर, उमेश सोनार, उमेश पाटील, स्वामी चौधरी अभिजीत पाटील, विजेंद्र शिरसाळे, मंगेश मोरे, प्रियाल पाटिल, पंकज पाटील,गोपाल चौधरी,वसंत शेटे,भुरा खाटकी,कुंदन पाटील प्रज्ञशिल सैंदाणे, मेघराज मोरे व मित्र परिवाराचे सहकार्य लाभत आहे.