अश्लील व्हिडिओ काढून केले ब्लॅकमेल
हिंजवडी : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच, त्याचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली देत त्या माध्यमातून तरूणीकडून सात लाख रुपये घेतल्याची घटना हिंजवडी येथे सप्टेंबर 2017 ते 11 डिसेंबर 2018 या कालावधीमध्ये घडली. याप्रकरणी पीडित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार साईनाथ शेट्टी (वय 44, रा. ग्रीन्स, थेरगाव. मूळ रा. मयूर टॉवर, मरोळ, अंधेरी इस्ट, मुंबई) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील वाचा
व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकण्याची धमकी…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेट्टी याने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत तिचा अश्लील व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ सोशल मिडीयावर टाकण्याची धमकी देत वेळोवळी तिला ब्लॅकमेल करीत तिच्याकडून सहा ते सात लाख रुपयांच्या महागड्या वस्तू घेतल्या. पीडित महिला गरोदर असतानाही जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिला शिवीगाळ करीत मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कविता रूपनर तपास करीत आहेत.