फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार

0

संशयिताला एमआयडीसी पोलिसांकडून अटक: तीन दिवसांची पोलीस कोठडी

जळगाव: महाविद्यालयात असतांनाच्या ओळखीतून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तसेच शारीरीक संबंध ठेवण्यास नकार दिला असता, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार करणार्‍या शहरातील फोटोग्राफर विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी नरेंद्र ज्ञानदेव सोनवणे (वय-24) रा. मेक्सोमाता नगर या संशयित तरुणास अटक केली आहे.

तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत 24 वर्षीय तरुणी वास्तव्यास आहे. ती महाविद्यालयात असतांना तिची नरेंद्र सोनवणे याच्याशी ओळख झाली. ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. यातच नरेंद्रने तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत तीला सप्टेंबर 2019 मध्ये जळगावात शहरातील एका हॉटेलमध्ये नेले. त्याठिकाणी लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. पुन्हा 18 ऑक्टोबर 2019 आणि 19 मार्च 2020 या दरम्यानच्या काळात नरेंद्रने तरुणीला हॉटेलमध्ये नेत तिला शारीरीक संबंध ठेवण्याची मागणी केली. यावेळी तरुणीने नकार दिला असता, नरेंद्रने तिला यापूर्वी काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. व धमकी देत तरुणीवर अत्याचार केले. याप्रकरणी पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरुन मंगळवारी संशयित नरेंद्र विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

या पथकाने केली संशयिताला अटक
गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित नरेंद्रबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी संशयिताला अटक करण्याच्या सुचना केल्या. लोकरे यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पाटील, हेमंत कळस्कर, चंद्रकांत पाटील, विजय बावस्कर संशयित नरेंद्र सोनवणे यास मंगळवारी सकाळी 9.32 वाजेच्या सुमारास अटक केली. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, रतिलाल पवार करीत आहे