लग्नाचे आमिष दाखवत पारोळा तालुक्यातील विवाहितेवर अत्याचार

पारोळा : झोपडीतील महिलेला दुचाकीवरून मध्यप्रदेशात नेत लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. पारोळा तालुक्यातील पीडीतेने या प्रकरणी पारोळा पोलिसात तक्रार दिल्यानंतर एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

लग्नाच्या आमिषाने केला अत्याचार
पारोळा तालुक्यातील एका गावातील महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. 9 मार्च रोजी रात्री 11 वाजता विवाहिता ही झोपडीत झोपलेली असताना संशयीत आरोपी डिगंबर मधुकर पाटील याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिला बळजबरीने दुचाकीवर बसवनू मध्यप्रदेशातील सेंधवा येथे नेले व एका भागातील खोलीत ठेवत सतत आठ दिवस अत्याचार केला. त्यानंतर आरोपीने पीडीतेला नातेवाईकांकडे नेल्यानंतरही तिथेदेखील तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर मात्र विवाहितेला सोडून संशयीत आरोपी डिगंबर पाटील हा पसार झाला. नागरीकांच्या मदतीने विवाहिता घरी आली आणि तिच्यावर घडलेला प्रसंग सांगितला. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात विवाहितेच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी डिगंबर पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव करीत आहे.