चाळीसगाव । शहरातील संजय गांधी नगरातील तरुणाने त्याच ठिकाणी राहत असलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीस लग्नाचे आमिष दाखवुन पळवुन नेल्याची घटना घडली असुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सोमनाथ शंकर परळकर (गवळी) (वय-45) रा.संजय गांधी नगर चाळीसगाव यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, इयत्ता दहावीत शिकत असलेली त्यांची 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला संजय गांधी नगर मध्ये राहत असलेला तरुण अशोक उर्फ बाल्या हिरामण पाटील याने लग्नाचे आमिष दाखवुन 21 फेब्रुवारी2018 रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास पळवुन नेल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरुन आरोपी अशोक हिरामण पाटील याचे विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुरनं. 41/2018 भादंवी कलम 363, 366 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरिक्षक रामेश्वर गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि युवराज रबडे करीत आहेत.