Rape of minor girl in Jamner taluka: Crime against youth पहूर : लग्नाचे आमिष दाखवून जामनेर तालुक्यातील एका खेडेगावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी तरुणाविरुद्ध पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. जगदीश अशोक पवार (जामनेर तालुका) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीताचे नाव आहे.
लग्नाचे आमिष दाखवत केला अत्याचार
जामनेर तालुक्यातील एका गावात साडेसोळा वर्षीय पीडीता कुटुंबासह वास्तव्यास असून संशयीत जगदीश अशोक पवार याने गुन्हा दाखल होण्याच्या तीन महिन्यांपूर्वी वेळोवेळी लग्न करण्याचे आमिष दाखवत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडीत तरुणीने पहूर पोलिस स्थानक गाठत फिर्याद दिल्याने जगदीश पवार याच्याविरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहेत.