अडावद । येथील इंदिरानगर प्लॉट भागातील दोन मुलींना तिन तरुणांनी लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. पोलीसांच्या सतर्कतेमुळे रावेर बसस्थानक परिसरातुन यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याघटनेमुळे अडावदसह परिसरात खळबळ उडाली असुन यात एक मुलगी अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यत अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
रावेर बसस्थाकात संशरास्पद आढळले
शनिवारी 9 रोजी मध्यरात्री येथील अजय धनराज साळुंके, दिपक रमेश साळुंके, समिर अरमान तडवी या तिघांनी इंदिरानगर प्लाँट भागात राहणार्या 18 वर्षीय व एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावुन पळवुन नेले. रावेर येथील बसस्थानक परिसरात हे संशयीतरित्या फिरतांना आढळून आल्याने पोलीसांनी त्यांना ताब्यात घेवुन अडावद पोलीसांच्या स्वाधिन केले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यत बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. अडावद पोलीस ठाण्याचे सपोनि जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि गजानन राठोड हे पुढील तपास करित आहे. दरम्यान चोपड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी आज दुपारी अडावद पोलीस स्टेशनला भेट देवुन घटनेचा आढावा घेतला.