Just five days after the wedding, the newlyweds left Jalgaon’s husband and passed away जळगाव : जळगावच्या फरसा व्यापार्याची फसवणूक करीत नववधू दादर रेल्वेस्थानकावरून पसार झाली आहे. या प्रकरणी मध्यस्थासह पत्नी विरोधात जळगाव शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अडीच लाख रुपये देवून केले लग्न
दहा वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झालेल्या प्रौढ फरसाण व्यापार्याने दुसर्या लग्नासाठी मध्यस्थाला अडीच लाख रुपये देऊन बेळगाव येथून मुलगी (33 वर्षीय महिला) जळगावात आणून तिच्या सोबत लग्न केले; परंतु नातेवाइकांची आठवण येते म्हणून लग्नानंतर पाच दिवसांत व्यापार्याला दादर येथे घेऊन गेलेली नववधू स्टेशनवरूनच गायब झाली.
दोघांविरोधात दाखल झाला गुन्हा
कांचननगरातील शैलेंद्र किसनलाल सारस्वत (46) यांनी लग्नासाठी बेळगाव येथून मुलगी आणून देण्यासाठी परीचीत प्रकाश सोनी (रा.बेळगाव) यांना दोन लाख 61 हजार रुपये दिले होते. त्यानंतर बेळगाव येथे एप्रिल महिन्यात मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. मुलगी पसंत पडल्यानंतर मे महिन्यात अपर्णा चंद्रकांत नाईक (33, रा. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) हिच्यासोबत शैलेंद्र सारस्वत यांचे जळगावात लग्न लागले. पहिल्या दोन-चार दिवसांतच तिने करमत नाही, नातेवाइकांची आठवण येते असे सांगून सारस्वत यांना दादर येथे घेऊन गेली. दादर रेल्वे स्टेशनवरून अपर्णा पसार झाली. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात प्रकाश सोनी व अपर्णा नाईक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.