लग्नातील गिफ्टचा स्फोट, दोघांचा मृत्यू

0

भुवनेश्‍वर : ओदिशातील बोलांगीर येथे लग्न सोहळ्यात मिळालेले गिफ्ट उघडताच स्फोट झाला. यामध्ये नवविवाहित तरुण आणि त्याच्या आजीचा मृत्यू झाला. तर नवविवाहिता गंभीर जखमी झाली. नवविवाहित जोडप्याला 21 फेब्रुवारी रोजी झालेल्या लग्नात अज्ञात व्यक्तीकडून हे स्फोटक गिफ्ट मिळाले होते. स्फोट एवढा मोठा होता की रुममधील संपूर्ण साहित्य अस्ताव्यस्त झाले. गिफ्ट बॉक्सवर रायपूर लिहिलेले होते.

18 फेब्रुवारीला पाटनगड येथील रहिवासी सौम्य शेखर साहू याचे लग्न बौध जिल्ह्यातील रीमा साहूसोबत झाले होते. सौम्य याने घरी आल्यानंतर आजीच्या रुममध्ये गिफ्ट उघडण्यास सुरुवात केली तेव्हा एका गिफ्ट बॉक्समध्ये स्फोट झाला.