जेवण तयार करणाऱ्यालाच कोरोनाची लागण: नंदुरबारात खळबळ

0

नंदुरबार: जेवण बनविणाराच खानसामाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याने बनविलेल्या जेवणाचा आस्वाद घेणाऱ्या व्हीआयपी लोकांची चांगलीच झोप उडाली आहे. दरम्यान आज नंदुरबारला तीन जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यात एका मोठ्या पदावर असलेल्या अधिकाऱ्याचा देखील समावेश आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून शेकडो जणांना क्वारंटाईन करण्याची वेळ आली आहे. नंदुरबार शहरातील एका राजकीय व्यक्तीच्या घरी असलेल्या विवाह सोहळा निमित्ताने जेवणावळीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात विविध पक्षाचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याबरोबर व्हीआयपीचा सहभाग होता. त्यात जेवण बनणाऱ्या खानसामाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे अनेक जण स्वतःहून होम क्वारंटाईन झाले आहेत. आज तीन जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यात रनाळे येथील 35 वर्षीय महिला आणि 48 वर्षीय नंदुरबार येथील पुरुष अधिकारी यांचा समावेश आहे. विवाह निमित्ताने होणाऱ्या गर्दीवर बंदी असतांना जेवणावळी साठी एवढी गर्दी जमवून नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचा सूर नागरिकांमध्ये उमटून येत आहे.