लग्नात सोने, दुचाकी न दिल्याने विवाहितेचा छळ

0
वाकड : लग्नामध्ये अंगावर दागिने अन् दुचाकी दिली नाही म्हणून विवाहितेचा वारंवार छळ होत असल्याचा प्रकार वाकड येथे घडला आहे. शितल शिंदे (वय 27) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती राजेंद्र शिंदे (वय 32, रा.ज्योतीबानगर, काळेवाडी) तसेच सासु, नणंद, दोन दीर व दोन जाऊ या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शितल व राजेंद्र यांचे 2013 साली लग्न झाले. मात्र लग्नात शीतल यांच्या आई-वडिलांनी शीतल यांना सोने दिले नाही. तसेच आरोपींनी शीतल यांच्या माहेरच्या मंडळींकडे दुचाकीची मागणी केली. दुचाकी देखील दिली नाही यावरून शितल यांना शिवीगाळ तसेच मारहाण केली जात होती. घराण्याला वंशाला दिवा दिला नाही तर तुला नांदवणार नाही, असे म्हणत शीतल यांचा मानसीक छळ सुरु करण्यात आला. त्यामुळे पिडीतेने थेट पोलीस ठाणे गाठत पती सह सासरच्यांविरोधात गुन्हा नोंदवला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.