मुंबई : बॉलिवूडची मस्तानी आणि मिसेस रणवीर सिंघ म्हणजेच दीपिका पदुकोन बऱ्याच मोठ्या ब्रेकनंतर आता पुन्हा चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. अॅसिड हल्ल्यातून बचावलेली तरुणी लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित चित्रपटात दीपिका झळकणार आहे.
या चित्रपटात मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेसाठी राजकुमार राव आणि आयुषमान खुराणा या कलाकारांच्या नावाची चर्चा आहे. मेघना गुलजार या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. आता यातील कोणाची या रोलसाठी निवड होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.