लग्नाला जाणाऱ्या हिंगोणेच्या युवकाचा मृत्यू

0

रस्यावरून गेलेली वीज तार गळ्यात अडकली

यावल– तालुक्यातील हिंगोणे येथून  लग्नाचे व-हाड घेवून येत असलेल्या ट्रकच्या छतावर बसलेल्या युवकाच्या गळ्यात रस्त्यावरून गेलेली वीज तारापैकी अर्थींगची  तार  अडकल्याने 18 वर्षीय  युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे  तर 40 वर्षीय इसम गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान  हिंगोणा -भालोद रस्त्यावर हिंगोण्यापासुन सुमारे दिड किलोमीटरवर घडली.  या दुर्दैवी घटनेने  हिंगोणा गावावर शोककळा पसरली असून  लग्नमंडपी दुखःचे  सावट पसरले आहे. तालुक्यातील हिंगोणे येथील अनिकेत वसंत तायडे या युवकाचे वाकोद, ता. जामनेर येथे मंगळवारी सायंकाळी 4 वाजेच्या लग्नासाठी ट्रकव्दारे हिंगोण्यावरून सकाळी 11 वाजेच्या सुमारास व-हाड निघाले होते. भालोद-भुसावळमार्गे जामनेर वाकोद येथे जावयास निघाले होते घरापासून अवघ्या 5 मिनीटाच्या अंतरावर हिगोणा -भालोद  रस्त्यावर सुमारे दिड किलोमीटरवर  रस्त्यास  आडवी गेलेल्या  विजेच्या तारापैकी आर्थींगची तार  युवकाच्या गळ्यात  अडकल्याने  अविनाश जगन्नाथ तायडे (वय 18 वर्षे) याचा जागीच मृत्यू झाला आहे तर संतोष बळीराम तायडे (40) वर्षे हे जखमी झाले आहेत. जखमीवर हिंगोणा येथील प्राथमिक  आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत तर मयत संतोष तायडे यास  येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणन्यात  आले आहे. या घटनेने  लग्नमंडपी  दुखःचे सावट पसरले आहे. संतोष हा शेतमजुरी करून कुटूंबाचे  पालनपोषण करायचा. त्याच्या पश्यात आई-वडील,  एक भाऊ, दोन बहिनी असा परीवार आहे.