लग्नासाठी अबू सालेमने मागितली ‘पॅरोल’ रजा

0

मुंबई-११९३ साखळी बॉम्बस्फोटात दोषी ठरलेला कुख्यात डॉन अबू सालेमने पॅरोलसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अबू सालेमने ४५ दिवसांची सुट्टी मागितली आहे. विशेष म्हणजे हा पॅरोल त्याने मुंब्राची रहिवासी असणाऱ्या कौसर बहार हिच्याशी लग्न करण्यासाठी मागितली आहे. अबू सालेमच्या अर्जावर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.