लग्नास नकार दिल्याने तरूणीवर अत्याचार

0

शहादा । लग्नास नकार दिल्याचा राग येवून महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार करून ते चित्रण सोशल मिडीरावर टाकण्याची व ठार मारण्याची धमकी देणाऱ्या एका महिलेसह सहा जणांविरोधातचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, इंजिनिअरींग कॉलेजला शिक्षण घेणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणीचा कॉलेजमधीलच विद्यार्थी विजय राजेंद्र निकम (रा. कवठळ ता. शहादा) यांच्याशी २ वर्षापूर्वी महाविद्यालयातच ओळख झाली. ओळख झाल्यानंतर सुमारे २-३ महिन्यानंतर विजयने या तरुणीस लग्नाची मागणी घातली. मात्र अपुर्ण शिक्षण व प्रेम विवाहास घरचे संमती देणार नाहीत यामुळे तरुणीने विजयला नकार दिला. या घटनेनंतरही दोघांची मैत्री कायम राहीली. याच दरम्यान विजयाने त्याच्या इतर तीन मित्रांशी तरुणीचा परिचय करुन दिला. सुमारे दीड वर्षापूर्वी विजयचा मित्र महेंद्र उर्फ पप्पु मराठे याच्या वाढदिवसाला यांनी तरुणीला घरी बोलावले. तरुणी घरी आल्यानंतर महेंद्रने तरूणीस कोल्ड्रींगस् मधून गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली.

6 संशयीतांविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान, आपल्यासोबत घडलेला प्रकार, झालेला अतिप्रसंग, मोबाईलवरील चित्रीकरण या सर्व घटनेची माहिती तिने अखेरीस आपल्या आईला व नातेवाईकांना दिली. यानंतर 16 रोजी तरुणीसह तिच्या नातेवाईकांनी 5:30 वाजेच्या सुमारास शहादा पोलिस स्टेशन येथे येऊन निरीक्षक संजय शुक्ला यांची भेट घेवून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी इनकॅमेरा तरुणीचा जाब घेवून तिने दिलेल्या माहितीनूसार विजय राजेंद्र निकम, रेखा राजेंद्र निकम दोन्ही (रा. कवठळ ता.शहादा), महेंद्र उर्फ पप्पू मराठे (रा. शहादा), निलेश भगवान कोळी (रा. नंदुरबार), चेतन गुमानसिंग राजपूत (रा. बिलाडी ता. शहादा) व धर्मेश विजरेंद्र पंड्या (रा. व्यारा जि. सुरत) या 6 संशयितांविरोधात बलात्कार, ब्लॅकमेलींग, ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर बडगुजर करीत आहे.