भोपाळ । मध्य प्रदेशामधील सीधी जिल्ह्यात लग्नाच्या वर्हाडाला घेऊन जाणार्या ट्रकला भीषण अपघात झाला. यामध्ये 21 वर्हाडी ठार झाले असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा अपघातग्रस्त ट्रक सोन नदीच्या पुलावरुन 100 फुट खोल नदीपात्रात कोसळला. या अपघातातील जखमींना येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.देवसरच्या हर्राबिजी गावातील मुजब्बील खान यांचे वर्हाड सिहावलच्या पमरिया गावाकडे निघाले होते. या दरम्यान, सोन नदीच्या हनुमान पुलावर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रक नदी पात्रात कोसळला. ही घटना मंगळवारी रात्री 9 ते 10 वाजेच्या सुमारास घडली.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये तसेच जखमींना 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा जाहीर केली. घटनास्थळावर पोलीस आणि जिल्हाधिकारी पोहोचले असून, परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.
अपघातातील मृतांचे नाव
मोहमद आबिद (30), शेरे राहा (10), गुलाम मो., अख्तर आली (13), मो.कलाम(12), मुसीम बेग (16), बाबू (15), बबलू लाल जयस्वाल(50), जयराम बंसल (25), लाल बहादूर (25), छोटकन(45), मुल्ला बख्स (30), बबलू (40), हनीफ (40), मेंहदी हुसैन (35), चंदुल बख्स (35), याकुब बख्स (45), कमालुद्दिन (64), आबिद राजा (25), सलीम बेग (15).