लग्न सोहळ्यात एकाला दोघांकडून मारहाण

0

जळगाव । शिवाजीनगरात रविवारी सायंकाळी 5.15 वाजेच्या सुमारास लग्नसोहळ्यात एकमेकांकडे बघण्यावरून एका तरूणाला दोघांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी सोमवारी शहर पोलिस ठाण्यात माजी महापौरांच्या दोन्ही पुत्रांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर परिसरातील दत्त मंदीराजवळ प्रवीण मुकूंदा शिंदे यांच्या घरी लग्न सोहळा होता. रविवारी सायंकाळी प्रवीण यांचा मित्र कमलेश रवींद्र जयस्वाल (वय 23, रा. लक्ष्मीनगर, कानळदानरोड) हा मंडपात बसलेला होता. त्यावेळी बाजुला माजी महापौर अशोक सपकाळे यांचे दोन्ही मुले राकेश अशोक सपकाळे, नवल अशोक सपकाळे हे उभे होते. त्यांनी कमलेश याला आमच्याकडे रागाने का बघतो. म्हणून वाद घालून बेदम मारहाण केली. या प्रकरणी जखमी कमलेश जयस्वाल याने दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.