उद्योजकांसोबत गडकरींचा सवांद

0

पुणे:- सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना केंद्र व राज्य सरकार तसेच तसेच बड्या उद्योजकांकडून असलेले येणे लवकर मिळावे या साठी प्रयत्न केले जात आहे. ही देणी 45 दिवसांऐवजी 30 दिवसात यावी या साठी मी प्रयत्न करत असल्याची माहिती केंद्रीय सूक्ष्म ,लघु व मध्यम उद्योग तसेच रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील लघु उद्योजकांसोबत सवांद साधतांना केले.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चर तर्फे नितीन गडकरी यांच्याशी ऑन लाईन सवांदाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्योग क्षेत्रातील 400 हुन अधिक व्यक्ती यात सहभागी झाले होते.

राज्य सरकारकडे पुढील महिन्याचे वेतन द्यायला पैसे नाहीत. केंद्र सरकारचाही महसूल कमी झाला आहे. तसेच उद्योग क्षेत्रही अडचणीत आले आहे. बँकांवरचा ताण वाढत आहे. सर्व क्षेत्रापुढे समस्या आहे. यातून आपल्याला मार्ग काढावा लागेल असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उद्योजकांना सांगितले.