नवी दिल्ली । आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांच्या विरोधात इंटरपोलद्वारे अटक वॉरंट जारी करण्याचे भारताच्या प्रयत्नांना अपयश आले आहे.इंटरपोलच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार या आंतरराष्ट्रीय संस्थेने मोदीच्या बाजूने निकाल दिला आहे. आयपीएलमधील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी मोदींविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची विनंती सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केली होती.
मात्र इंटरपोलने त्यास नकार दिला आहे. इंग्लंडमध्ये वास्तव्यास असलेल्या ललित मोदी यांनी याबाबत ट्विट केले आहे. इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस देण्यास नकार दिला आहे, असे कळल्यावर माझ्या डोक्यावरची टांगती तलवार गेली, असे त्यांनी म्हटले आहे.दरम्यान, ‘ईडी’ने इंटरपोलची ही भूमिका संशयास्पद असल्याचे म्हटले आहे.