न्यूयॉर्क । दिवसेंदिवस तंत्रज्ञानाने कमालीची प्रगती केली आहे. आणि ती पुढेही होत राहणार आहे. आता अमेरिकास्थित डिजिटल फोटोग्राफी कंपनी आणि कॅमेर्यांची निर्मिती करणारी ‘लाईट’ ही कंपनी 9 कॅमेरे असलेला स्मार्टफोन विकसित करत असल्याची माहिती कंपनीच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.
या स्मार्टफोनच्या मदतीने ग्राहक 64 मेगापिक्सलपेक्षाही जास्त क्षमतेचे फोटो काढू शकणार आहे. हा स्मार्टफोन परंपरागत ‘डीएसएलआर’ कॅमेर्यालाही ‘रिप्लेस’ करू शकतो; असा दावा कंपनीने केला आहे.