लवकरच सुरु होणार रामायण एक्स्प्रेस

0

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने रामायण एक्स्प्रेसची घोषणा केली आहे. रामायण एक्स्प्रेस प्रभू रामचंद्राशी संबंधित सगळ्या स्थळांची यात्रा करणार. यामध्ये श्रीलंकेतील काही ठिकाणांचाही समावेश असणार आहे. तसेच ही एकूण १६ दिवसांची सहल असणार आहे. दिल्लीहून या एक्स्प्रेसला हिरवा कंदिल दाखवला जाईल.

एकीकडे देशात प्रभू रामचंद्रांचे मंदिर उभारले जाणार, पुतळा उभारला जाणार असे म्हटले जाते आहे. योगी आदित्यनाथ यांनीही शरयू नदीच्या किनारी रामाच्या पुतळ्याची घोषणा केली आहे. तर राम मंदिरासाठी अध्यादेश काढला जावा असे म्हटले जाते आहे. अशात आता भारतीय रेल्वेने रामायण एक्स्प्रेसची घोषणा केली आहे.