‘लव्ह जिहाद’शी लढण्यासाठी…

0

केरळमधील शफीन जहा या धर्मांधाने एका हिंदू मुलीचे धर्मपरिवर्तन करून तिच्याशी विवाह केला. इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी सीरियाला पाठवण्याच्या उद्देशाने सदर मुलीशी विवाह करण्यात आला होता, असा आरोप याप्रकरणी झाल्याच्या बातम्या होत्या. या विवाहाला मुलीच्या वडिलांनी आक्षेप घेऊन न्यायालयात धाव घेतली. केरळ उच्च न्यायालयाने हा विवाह रहित केला. यावर शफीन जहा याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. धर्म आणि राष्ट्र विरोधकांची तळी उचलणारे काँग्रेसचे कपिल सिब्बल यांनी धर्मांध शफीन याच्या वतीने मुलगी सज्ञान असल्याचे सांगत बाजू मांडली; पण सर्वोच्च न्यायालयाने या जिहादची गांभीर्याने नोंद घेतली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची ‘ब्लू व्हेल’ या आत्मघातकी खेळाशी तुलना करून एकप्रकारे लव्ह जिहादच्या मोडस आपरेंडीवर आणि त्याच्या विनाशकारी शेवटावर भाष्य केले आहे.

‘आजकाल कोणाचेही विशिष्ट हेतूसाठी मतपरिवर्तन करणे शक्य आहे’, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याच्या बातम्या सर्वत्र प्रसिद्ध झाल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयामुळे या टिपणीमुळे ‘लव्ह जिहाद वगैरे नसतेच, प्रेमाला कशाचे बंधन नसते’ वगैरे म्हणणार्‍यांना सणसणीत चपराकच बसली आहे. या पार्श्‍वभूमीवर आतातरी या संकटाकडे गांभीर्याने पाहून या जिहादची भयावहता जाणून घेऊन हिंदू मुलींना वाचवण्यासाठी ठोस प्रयत्न करणे आवश्यक आहे.जिहाद हे धर्मांधांनी मुसलमानेतरांविरोधात छेडलेले धर्मयुद्धच आहे. लव्ह जिहादव्यतिरिक्त लॅन्ड जिहाद, फतवा जिहाद, सेक्स जिहाद, फिल्म जिहाद इत्यादी डझनभर जिहाद अस्तित्त्वात आहे.

काफिरांना ठार करून पृथ्वी इस्लाममय करण्याची धर्मांधांची भावना आहे. त्याच क्रूर भावनेतून धर्मांधांना मुसलमानेतरांवर विरुद्ध लढण्यासाठी उद्युक्त केले जाते. हिंदू मुली लव्ह जिहादच्या विळख्यात अडकल्यानंतर त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जातो. मुलींना फसवण्यासाठी प्रसंगी वशीकरण, काळी जादू यांचाही वापर केला जातो. एकदा का मुलगी फसली की, धर्मांधांना त्याची बक्षिसी दिली जाते. त्यासाठी मुलींच्या जातीनुसार ‘दर’ही ठरले असल्याचे वास्तव मध्यंतरी काही प्रसिद्धीमाध्यमांनी उघड केले होते. नुकतेच राष्ट्रीय नेमबाज तारा सहदेव हिच्या संदर्भातही लव्ह जिहादचा डाव खेळला गेल्याचे उघड झाले होते. या केवळ काही प्रदेशात घडणार्‍या मोजक्या घटना असून लव्ह जिहादचे जाळे सर्वदूर पसरले आहे. वरकरणी प्रेमाचा मुलामा असला, तरी लव्ह जिहादींच्या मनात विषच असते, हे सत्य आहे. त्यामुळे कुणाशी मैत्री करावी आणि करू नये, याकडे मुलींसह पालकांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. हिंदू जनजागृती समितीने यासंदर्भात पोलीस महासंचालकांकडून माहिती मागवली होती. राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) देवेन भारती यांच्या स्वाक्षरीने या अर्जाला उत्तर देण्यात आले होते. त्यात राज्यातील ‘लव्ह जिहादची प्रकरणे’ अशा सुस्पष्ट उल्लेखाने आकडेवारी देण्यात आली होती. केरळमधील उपरोल्लेखित प्रकरणासंदर्भातही केरळ उच्च न्यायालयाने त्यांच्या निकालपत्रात म्हटले आहे की, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या लोकांकडून सदर महिलेवर नजर ठेवण्यात येत होती. मुस्लीम युथ फोरम, शाहीन फोर्स, नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट, कॅम्पस फ्रंट यांच्यासारख्या संघटना या प्रकारामागे असाव्यात. काही मुसलमान संघटनांकडून तसेच आखाती देशातून त्यासाठी पैसे पुरवण्यात येत असल्याविषयी न्यायालयाने शंका उपस्थित केली आहे. सहस्रो तरुणींचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍या या ‘लव्ह जिहाद’विषयी विद्यमान केंद्रीय गृहमंत्र्यांनी 2 वर्षांपूर्वी अनपेक्षित अनभिज्ञता दर्शवली होती. देशरुपी घरातील अनेक महिला ‘लव्ह जिहाद’ची शिकार होत असताना गृहमंत्र्यांनी घर सांभाळण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. ‘लव्ह जिहाद’च्या राक्षसापासून हिंदू मुलींना वाचवण्यासाठी त्यांना धर्माचे शिक्षण मिळणे आवश्यक आहे.

धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच आज हिंदूंचे वैचारिक प्रदूषण होत आहे. त्यातूनच सर्वधर्मसमभावासारख्या भंपक कल्पना हिंदूंना आदर्शवत वाटत आहे. हिंदूंमध्ये स्वधर्माभिमान जागृत झाला, तर हिंदू मुली लव्ह जिहादच्या दलदलीत त्या फसणार नाही. यासंदर्भात हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी विचारांच्या संघटना गेली काही वर्षे सातत्याने जागृतीही करत आहेत. आता तेवढ्यावरच अवलंबून न राहता ‘लव्ह जिहाद’च्या विरोधातील लढा आता जनतेनेच अधिक व्यापक करण्याची आवश्यकता आहे.

– अभय वर्तक
राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था
7775858387