‘लव जिहाद’ला ‘शिवविवाह’ म्हणणे, हा छत्रपती शिवरायांचा अपमानच ! – हिंदु जनजागृती समिती

 

     भारतीय कायद्यानुसार वयात आलेल्या युवकयुवतीने स्वसंमतीने विवाह करणेहे कायदेशीर आहेमात्र त्याचा राजकीय दृष्टीने लाभ उठवण्याचा प्रयत्न करणेहे पूर्णपणे अयोग्य आहेछत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रचलित कथेनुसार कल्याणच्या सुभेदाराच्या मुसलमान सुनेचा आदर केलातिचे धर्मांतर केले नाहीपरंतु त्याच वेळी त्यांनी बजाजी निंबाळकर आदी जबरदस्तीने मुसलमान बनवलेल्या हिंदूंना त्यांचे शुद्धीकरण करून पुन्हा हिंदु धर्मात परत घेतले आणि त्यांच्याशी सोयरीक जोडलीआज लव्ह जिहादचे भयंकर षड्यंंत्र चालू असतांना त्यात अडकलेल्या हिंदू युवतींना पुढे जबरदस्ती इस्लाम कबूल करण्यासाठी अत्याचार करण्यात येताततसेच अनेकींची हत्याही केल्याच्या अनेक घटना उघड झाल्या आहेतउद्या या कुटुंबाला मुले झाल्यास ती हिंदू असतील कि मुसलमान ?अशा कोणत्याही प्रश्‍नांची उत्तरे न देता केवळ प्रसिद्धीसाठी लव जिहादला शिवविवाह म्हणणेहा छत्रपती शिवरायांचा अपमान आहेअसे हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे.

    पूर्वी समाजवादी चळवळीतले नेतेही त्यांच्या कार्यकर्त्या असणार्‍या हिंदू मुलींचा विवाह मुसलमान युवकांसोबत लावून प्रसिद्धी मिळवत असतमात्र स्वतःच्या मुलींसाठी कोकणस्थदेशस्थ असे भेद पाहून मुलगा शोधत असतया समानतेच्या चळवळीत छायाचित्रे काढून प्रसिद्धी मिळवणार्‍यांनी स्वतःच्या मुलींसाठी असा विवाह ठरवल्यास खरे तर स्वतः केले आणि मग सांगितलेअसा आदर्श घालून देता येईलमहाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौरूपाली चाकणकर या अशा विवाहाचे समर्थन करत आहेतहे दुर्दैवी आहेएखाद्या आयेशारुकसाना हिचा विवाह एखाद्या हिंदू मुलाशी लावून त्या समारंभात चाकणकर यांनी जाऊन उभयतांना आशीर्वाद द्यावेतमग त्यांची धर्मनिरपेक्षता खरी असल्याचे म्हणता येईलखरे तर महाराष्ट्रात आज 25 हजार मुली आणि महिला गायब असण्याची धक्कादायक स्थिती असतांना महिला आयोगाच्या अध्यक्षा अशा कार्यक्रमात सहभागी होत आहेतहे दुर्दैवी आहेतसेच शिवविवाहाच्या नावे धर्मद्रोहाची राजकीय पोळी भाजणार्‍या ब्रिगेडी प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतोअसेही समितीने म्हटले आहे.