सौदी अरेबिया हा वहाब्बी इस्लामचा प्रसार करणारा देश आहे, असे ब्रिटनने नुकतेच जाहीर केले. सौदी ब्रिटनमध्ये दहशतवाद पसरवत असल्याचे जॅक्सन अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. वहाब्बी इस्लाम भारत-पाकमध्ये आक्रमकपणे लश्कर-ए-तोयबाचा प्रसार करत आहे. ही अत्यंत हिंस्त्र दहशतवादी टोळी फक्त भारताविरुद्ध लढण्यासाठी पाक आणि सौदीने निर्माण केल्याची मी मांडणी केली आहे. पुढील काळात इसिस लश्करबरोबर भागीदारी करेल व भारतात प्रचंड हिंसाचार करेल, असे भाकीत केले होते. अमेरिका या सर्व घडामोडीला छुपा पाठिंबा देत राहिला आहे आणि देत राहील. मग तो आपला मित्र कसा, हा प्रश्न मी अनेकदा उपस्थित केला आहे? दुसरीकडे आता इस्त्रायलला भेट देणारे पहिले पंतप्रधान म्हणून मोदीसाहेबांनी इतिहास घडवला. गेली 70 वर्षे वाजपेयीसकट भारताचा कुठलाही प्रधानमंत्री इस्त्रायलला गेले नाहीत. भारताच्या अनेक वर्षांच्या परराष्ट्र धोरणाला मोदीजी तिलांजली देत आहेत. भारताला धोका आपल्या अपरिपक्व नेतृत्वात आहे. पाकिस्तानला आपण नष्ट करू शकत नाही केवळ कणाहीन नेतृत्वामुळे. मोदींना नवाज शरीफच्या वाढदिवसाला जाण्याची काय गरज होती? आणि इस्त्रायलला का गेले? याचे कारण एकच आहे. इस्त्रायल अन् पाकिस्तान अमेरिकेचे दोन मुख्य चमचे आहेत. म्हणून अमेरिका भारतावर या दोन देशांबरोबर मैत्री करण्यासाठी प्रचंड दबाव आणते. कारगिल युद्धातदेखील अमेरिकेने भारताला पाकवर हल्ला करू दिला नाही. मनमोहन सिंग अर्थमंत्री झाल्यावर इस्त्रायलमध्ये भारताने दूतावास बनवला व आता मोदींना इस्त्रायलला भेट देण्यास भाग पाडले. इस्त्रायल हा भारताला अमेरिकन हत्यार विकणारा प्रमुख दलाल आहे. अमेरिका आणि इस्त्रायल दोघे दहशतवादाविरुद्ध लढण्याची भाषा करतात, पण पाकला समर्थन देतात आणि पाक हे मुख्य दहशतवादी राष्ट्र आहे.
पहिला पाकिस्तानी दहशतवादी गट 1980 ला अमेरिकेने पाक खडख ला निर्माण करायला लावला. त्यावेळेस, जगभरातून अफगाणिस्तानमधील कम्युनिस्ट रशियन सैन्याविरुद्ध लढण्यासाठी जिहादी गोळा झाले. आता जवळ जवळ 24 गट पाकमध्ये कार्यरत आहेत. त्यातील सर्वात भयानक गट म्हणजे लश्कर-ए-तोयबा. हा पूर्ण वाहब्बी/अहिले हदीत गट आहे. हे तालिबानच्याविरुद्ध आहेत. लश्कर हे पूर्णत: पाक ळीळ ने बनवले. आजसुद्धा लाहोरजवळ मुर्दिके येथे मुक्तपणे वावरत आहे. लश्कर-ए-तोयबाचा निर्माता हाफिज सय्यद. याचे कुटुंब मूळ हिमाचल प्रदेशमधील. भारताच्या फाळणी वेळेस त्याचे कुटुंबातील 36 लोकांना हिंदू टोळ्यांनी कापून काढले. पंजाब विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर, सौदीमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी केली. त्यादरम्यान तो वाहब्बी पंथात समाविष्ट झाला. 1980 च्या दशकात तो रशिया विरोधातील युद्धात सामील झाला. तिथे तो ओसामा व त्याचा गुरू आझमचा शिष्य झाला. आझम हा पेशावरमध्ये जिहादचा मुख्य गुरू झाला. सौदी पैशावर त्याने अरब जगतातील युवक जिहादसाठी गोळा केले. आझमने हाफिजला मरकज ए दवा अल इर्शाद (चऊख) स्थापन करायला मदत केली. ही संघटना वाहब्बी/अहले हदीथ या पंथाला संलग्न होती. त्याचे मुर्दीके मुख्यालयातील लक्ष इस्लामिक वातावरण निर्माण करणे हे होते. 1993 मध्ये बाबरी मस्जिदनंतर त्याने पहिला हल्ला सैन्यावर केला. भारताला सर्वात मोठा धोका सौदी अरेबिया, पाकिस्तान यांच्या अघोरी युतीचा आहे. सौदी राजाचे संरक्षणाची जबाबदारी अमेरिकेवर आहे आणि त्यांचे अंगरक्षक पाकिस्तानी सैनिक आहेत. हे माहीत असून मोदी ट्रम्पला भेटताना यावर एक शब्दही बोलत नाहीत. भारताविरुद्ध या सर्व कारस्थानाचा जनक अमेरिका आहे. मोदी इंदिरा गांधींसारखे अमेरिकन राष्ट्रपतीला इशारा देऊन आले पाहिजे होते की, पाकिस्तानचा नाद सोडा नाही, तर आम्ही पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून गायब करून टाकू.
ब्रि. सुधीर सांवत – 9987714929