लष्कराला ‘मोदी सेना’ म्हणणारे देशद्रोही – सिंह

0

नवी दिल्ली – भारतीय लष्कराला ’मोदींची सेना’ म्हणत असाल तर ते चुकीचेच आहे. तसेच तो देशद्रोहही आहे, असे विधान सरंक्षण राज्यमंत्री व्ही.के.सिंह यांनी केले आहे. एका विदेशी माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते, मात्र, आपण अशी टिप्पणी केलीच नव्हती, असं ट्विट त्यांनी केलं. काही वेळाने ते ट्विटही त्यांनी हटवलं.

’भाजपच्या प्रचारात सहभागी झालेले लोक स्वतःला ’सेना’ म्हणून संबोधतात. पण आम्ही कोणत्या सेनेबद्दल बोलतोय? भारतीय लष्कराबद्दल बोलतोय की पक्षाच्या कार्यकर्त्यांबद्दल? त्याचा संदर्भ मला माहिती नाही. जर कुणी भारतीय लष्कराला मोदींची सेना म्हणत असेल तर ते चुकीचे आहे. तसेच देशद्रोहही आहे, असे सिंह म्हणाले. या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर आपण अशी टिप्पणी केली नसल्याचे सिंह यांनी सांगितले. मुलाखत घेणार्‍या माध्यम प्रतिनिधीने कट-पेस्ट’चे काम केले आहे. असे करण्यासाठी संबंधित माध्यम समूहाला किती पैसे मिळाले? असा प्रश्न त्यांनी ट्विटद्वारे केला. मात्र, त्यानंतर काही वेळाने ते ट्विटही हटवले.