पुणे : महापालिकेच्या लष्कर पाणीपुरवठा विभागांतर्गत तातडीच्या दुरुस्तीच्या कामासाठी काही भागांना होणारा पाणीपुरवठा गुरुवारी (दि.20) बंद राहणार आहे. पाणीपुरवठा बंद असणार्या भागांमध्ये लष्कर जलकेंद्र परिसराच्या अखत्यारितील कोंढवा खुर्द सर्व्हे नंबर 46, साईबाबा नगर गल्ली क्रमांक 9 व 10, नवाजीश पार्क, डी.एड. कॉलेज, भाग्योदय नगर गल्ली क्रमांक 29,30 व 31 या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी सकाळी या परिसराला उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, अशी माहिती पालिकेच्या लष्कर पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.