लसीकरणा नंतर नक्की काय करावे? आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना

राज्यासह संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोनाच्या या दुसर्‍या लाटेचा सामानाकारायाचा असेल तर लसीकरणाचे काम वेगाने करणे भाग आहे आणि ते होतंही आहे. अश्या वेळेस लसीबद्दल नागरिकांच्या मनात खूप शंका आहेत यासाठी आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

आधी लसीपासून एलर्जी उद्भवली असेल तर?

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोविड -१९ ची लस घेतल्यानंतर व्यक्तीला कोणत्याही लसीची एलर्जी झालीये का? हे जाणून घ्यायला हवं. जर यापूर्वी असे घडले असेल तर त्या व्यक्तीस एलर्जी तज्ञाकडे पाठवावे. एखाद्या तज्ञांच्या सल्ल्यानुसार पुढे जावे.

आरोग्याची स्थिती कशी आहे ?

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, लस उत्पादकांनी खबरदारी म्हणून सांगितलेल्या आरोग्याच्या स्थितीचा आढावा घ्यावा. यामध्ये गर्भधारणा, कमुकवत रोगप्रतिकारक प्रणाली आणि वृद्ध व्यक्तीं, कोणत्याही गंभीर आजाराचा समावेश आहे. या अटी असलेले लोक लसीकरणासाठी पात्र आहेत, परंतु त्यांना आवश्यक माहिती आणि सल्ला देण्यात यावा.

साईड इफेक्ट्स येतातच

लस घेतल्यानंतर काही साईड इफेक्ट्स दिसले, म्हणजेच लस शरीरात योग्य पद्धतीनं कार्यरत आहे. या दुष्परिणामांमध्ये हात दुखणे, सौम्य ताप, थकवा, डोकेदुखी, स्नायू किंवा सांध्यातील वेदना यांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार आरोग्याच्या परिस्थितीचे परीक्षण करून दुष्परिणामांची माहिती दिल्यानंतर ही लस घेतली जाऊ शकते.

१५ मिनिटांपर्यंत मुल्यांकन गरजेचे

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, लसीकरणानंतर ज्या व्यक्तीस लसी दिली गेली आहे त्याचे मूल्यांकन 15 मिनिटांसाठी केले पाहिजे. त्याच वेळी, ज्या कोणालाही लसीची एलर्जी आहे त्याचे कोरोना लस लागू झाल्यानंतर 30 मिनिटांसाठी मूल्यांकन केले पाहिजे. या व्यतिरिक्त त्या व्यक्तीला त्रास झाला या तर कुठे उपचार घ्यावेत हे माहीत असायला हवं. लस घेल्यानंतर, त्या व्यक्तीस काही अनपेक्षित किंवा गंभीर प्रतिक्रिया जाणवल्यास किंवा एलर्जी असल्यास, ताबडतोब वैद्यकीय पर्यवेक्षकास त्याबद्दल कळवावे.

काय खाण असेल योग्य?

शरीराला हायड्रेड ठेवणं महत्वाचं आहे. जर तुम्ही कोरोनाची लस घेण्याची तयारी करत असाल तर जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. अशा पदार्थाचे सेवन करा ज्यात पाणी आणि फायबर्सचं प्रमाण खूप असतं. कोरोनाची लस घेतल्यानंतर साईड इफेक्टसशी तीव्रता कमी होण्यासाठी मदत होऊ शकते.

ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रीशनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार माहामारीच्या काळात शरीराला निरोगी ठेवण्यासाठी जास्तीत जास्त हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. जास्त कॅलरीजयुक्त आहार टाळून फायबर्स असलेल्या अन्नपदार्थांचा आहारात समावेश करा. फायबर असलेल्या फळांचा किंवा ज्यूसचा आहारात समावेश करा.