भुसावळातील डी.एल.हिंदी स्कूलमध्ये एकदिवशीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
भुसावळ- विज्ञानामुळे मानवाची प्रगती झाली पण या प्रगतीसोबतच विज्ञानाचा दुरुपयोग होऊ लागल्याने त्याचे दुष्पपरीरणाम आपल्याला दिसून येत आहे. आपण आपल्या स्वतःच्या भौतीक सुविधांसाठी निसर्गाचा र्हास केला आहे. भविष्यात हे आपल्यासाठी अडचणीचे असून निसर्ग सुविधांचा समतोल राखल्यास मानवी आयुष्य सुखमय होऊ शकेल, असे प्रतिपादन आमदार संजय सावकारे यांनी केले. डी.एल.हिंदी स्कूलमध्ये मंगळवारी आयोजित एकदिवशीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनप्रसंगी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी जीवनातील विज्ञानाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे, विज्ञानाचा सदुपयोग केल्यास देशाला सकारात्मक दिशेने नेता येणे शक्य आहे. लहान वयातच विद्यार्थी संशोधन वृत्ती असल्याने भविष्यातील हे वैज्ञानिक आहेत.
यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
उद्घाटन म्हणून हिंदी सेवा मंडळाचे शिक्षण सभापती आर.जी.नागराणी यांच्या हस्ते झाले. संस्थेचे कोषाध्यक्ष एम.डी.तिवार, सहमंत्री बिशन अग्रवाल, कार्यकारणी सदस्य गोपालदास अग्रवाल, मनोज बियाणी, गटशिक्षणाधिकारी महेंद्र धीमते, शालेय पोषण आहार अधीक्षक सुमित्र अहिरे, शिक्षण विस्ताराधिकारी रागिणी चव्हाण, तुषार प्रधान, डी.एल.हिंदी विद्यालयाचे प्राचार्य आर.आर.सहानी, सु.ग टेमाणी विद्यालयाचे प्राचार्य रमा तिवारी, र.न.मेहता विद्यालयाचे प्राचार्य रंजना शर्मा, उपप्राचार्य एस.टी.अडवाणी, पर्यवेक्षक के.बी.सक्सेना आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी महेंद्र धीमते यांनी केले.
निरोप समारंभाला यांची होती उपस्थिती
निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदी सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडीयाले होते. यावेळी महेशदत्त तिवारी, हिंदी सेवा मंडळाचे सभापती रमेश नागराणी, गटशिक्षणाधिकारी महेंद्र धीमते, शालेय पोषण आहार अधीक्षक सुमित्र अहिरे, विस्ताराधिकारी रागिणी चव्हाण, तुषार प्रधान, केंद्रप्रमुख नलिनी झांबरे, रवींद्र तिडके, विज्ञान समितीचे प्रमुख एस.एस.अहिरे, सुनील वानखेडे, बी.बी.जोगी, बी.पी.वारके, प्राचार्य आर.आर.सहानी, प्राचार्य सुधा शुक्ला, प्राचार्य रमा तिवारी, उपप्राचार्य एस.टी.आडवाणी, पर्यवेक्षक कि.बी.सक्सेना आदी उपस्थित होते.
जिल्हा स्तरासाठी निवडलेली उपकरणे अशी
प्राथमिक गट- प्रथम राहुल मेहेरे (जि.प.शाळा कन्हाळा, सफाई यंत्र), द्वितीय- सपना पाटील (बियाणी मिलिटरी स्कूल, ग्रीन फीवेल किट) तृतीय- भूषण वावले (डी.एल.हिंदी विद्यालय, स्मार्ट सिटी)
माध्यमिक गट- अजिंक्य चौधरी (डी.एल.विद्यालय, वॉटर मॅनेजमेंट) द्वितीय शिवमकुमार भंगाळे (के.नारखेडे विद्यालय, कॉन्सेप्ट ऑफ एरोप्लेन) तृतीय- यश कोठारी (बियाणी इंग्लिश मीडियम स्कूल, स्मार्ट फार्मिंग)
प्राथमिक शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य
प्रथम- शारदा सुरवाडे (जि.प.शाळा, पिंपळगाव खुर्द, मनोरंजनातून शिक्षण)
माध्यमिक शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य
पी.पी.मोयखेडे (डी.एल.हिंदी विद्यालय, भौमीतीक बहुउद्देशीय उपकरणे)
प्राथमिक लोकसंख्या शिक्षण
अमित चौधरी (र.न.मेहता विद्यालय, लोकसंख्या शिक्षण)
माध्यमिक लोकसंख्या शिक्षण
कविता अग्रवाल (डी.एल.हिंदी विद्यालय, लोकसंख्या शिक्षण)
प्रयोगशाळा परीचर
बी.जे.सोनवणे (डी.एल.हिंदी विद्यालय, पर्यावरणाचा र्हास